सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील वाठार पोलीस ठाणे हद्दीत सातारा ते लोणंद या राज्यमार्गावरील देऊर रेल्वे गेट फाटक क्र. ४७ किमी १२२/८-९ येथे नविन रेल्वे रुळ टाकण्यासाठी व निरीक्षणासाठी सातरा ते लोणंद हा राज्य महामार्ग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुक व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये उद्या दि. 8 जून मध्यरात्री पासून ते 10 जून रात्री 24 वाजेपर्यंत तीन दिवसासाठी वाहतुकीत बदल केले आहे.
दरम्यान, करण्यात आलेल्या बदलानुसार लोणंदवरुन साताराकडे तसेच फलटण वरुन साताराकडे येणारी अवजड वाहतुक लोणंद वरुन खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर महामार्गावरुन साताराकडे जाईल. साताऱ्याकडून वाढे फाटा ते लोणंदकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक वाढे फाट्यावरून न वळवता सरळ पुणे बंगलोर महामागनि शिरवळ मार्गे लोणंदकडे जाईल. फलटण वरुन साताराकडे येणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने आदकी फाटा (फौजी ढाबा) येथुन तडवळे स.वा. वरुन पिपोडे बु. वाघोली अंबवडे स. वाघोली मार्गे साताराकडे जातील.
लोणंद-सालपे मार्गे येणारी हलकी व दुचाकी वाहने तडयळे स.वा. वरुन पिंपोडे बु. वाघोली अंबवडे स. वाघोली मार्गे सातारा/कोरेगाव कडे जातील. सातारा/कोरेगांव कडुन लोणंद व फलटण बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी व दुचाकी वाहने अंबवडे स. वाघोली येथुन वाघोली मार्गे पिंपोडे बु. ते तडवळे स.वा. ते लोणंद कडे / आदर्की फाटा (फौजी बाबा). मार्गे फलटण कडे जातील. मौजे देऊर रेल्वे गेट क्रासिंग हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तिन दिवत्त बंद राहील. शाळा/महाविदयालयीन विदयार्थ्यांची गैरसोय होवु नये याकरीता महराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रा. प बसेसना अंबवडे स.वाघोली येथुन वाघोली मार्गे पिंपोडे बु ते वाठार या मार्गावरुन येण्यासाठी व जागेसाठी परवाणगी देणेत येत आहे.
वाहतूक ज्या-ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे.