राऊतांनी महायुतीत कितीही खडे टाकले अन् पवारांनी शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी..; कराडात चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

0
408
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महायुतीतील प्रत्येकालाच आप आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय आणि अजित पवार तिरंगामय करु म्हटले असले तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच एकत्रित सामोरे जाणार आहोत. शरद पवारांनी कितीही शँडो कॅबिनेट तयार केल्या तरी त्याचा या सरकारवर काही परिणाम होणार नाही. त्याचा उपयोग होणार नाही. आणि महाराष्ट्रातील जनता आता संजय राऊत यांना ऐकत नाही, आम्ही पण ऐकत नाही. त्यामुळे राऊतांनी कितीही खडे टाकले तरी महायुती तुटणार नाही,अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार व संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. यावेळी आमदार डॉ.अतुल भोसले (Atul Bhosale), आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, रामकृष्ण वेताळ आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी कोणताही घोटाळा केला नाही आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे. संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडावी, चांगल्या भूमिका सांगाव्यात. तसे पाहिले तर महाराष्ट्राची जनता संजय राऊत यांना आता ऐकत नाही. आम्ही पण ऐकत नाही हे सरकार प्रचंड ताकतीने चालणार आहे. यामुळे संजय राऊतांनी कितीही खडे टाकले तरी महायुती तुटणार नाही.