प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं तसं होता येतं का?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्यावतीने जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे ‘मेरी माटी, मेरा देश’ या या अभियानाच्या अंतर्गत ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सातारा व कराड दौऱ्यासाठी साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केल्या गेलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला वाटत आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, तसं होता येत का? राज्यात तीन आघाडीचं सरकार आहे. जो निर्णय घेतला तो तिघ्यांच्यात मिळून घेतलका जात असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हंटले.

साताऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. मदन दादा भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, पालकमंत्री बदलाबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. जे ठरलं होतं तेच झालं आहे. नवीन पालकमंत्री मिळाल्यामुळे अधिक परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या योजनामधून चालना मिळणार आहे. पालकमंत्री जादा मिळाल्याने जिल्ह्यांना विकासकामात न्याय मिळेल. अजित पवार कधीही नाराज नव्हते, ते कधीही नाराज होत नसतात. या निवडीत राजकीय रंग आणू नये. एका व्यक्तीवर 4 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती, आता प्रत्येकाला वेगळी जबाबदारी मिळाल्याने विकास कामे गतीने होतील.

काॅंग्रेस पक्षात ब्लड कॅन्सर आहे. काॅंग्रेसच्या रक्तात कन्फ्यूज करण्याचं राजकारण आहे. काॅंग्रेसचं 65 वर्ष सरकार हे कन्फ्यूज करण्याच चाललं कन्व्हेन्स करण्याच नाही. काॅंग्रेस डेव्हलपमेंटच काही सांगणार नाही. भाजप मोदींनी, देवेंद्रनी आणि शिवेंद्रराजेंनी केलेली काम सांगणार आहे. आम्ही आमची काम सांगून मत घेणार आहे. आम्ही जो व्यक्ती कन्फ्यूज झालेल आहे त्याला कन्व्हेन्स करण्यासाठी निघालो असल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.