कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील चरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे अष्टपैलू, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्व असणारे प्रयोगशाळा सहाय्यक श्री. चंद्रकांत नारायण कांबळे यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
यावेळी आयोजित समारंभास अध्यक्षस्थानी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र कांबळे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी विभागीय आयुक्त मा. श्री. प्रभाकर देशमुख होते. यावेळी देशमुख यांनी श्री.चंद्रकांत कांबळे यांचेकडून उर्वरित आयुष्यात कुटुंबाकडे लक्ष देणे तसेच सामाजिक कार्यात सक्रियतेने घडपण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यांनी महान व्यक्तीच्या उदाहरणाद्वारे स्वताचा व्यक्तिमत्व विकास कसा साधतायेतो, याविषयी सांगून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या वतीने श्री.चंद्रकांत कांबळे यांचा पोशाख व सन्मानपत्र देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. चंद्रकांत कांबळे यांच्याविषयी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व प्रशासकीयतसेच व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणारे त्यांचे कुटूंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवारातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन त्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत जनरल बॉडी सदस्या, रयत शिक्षणसंस्था सौ. हर्षदा जाधव, स्कूल कमिटीचे सदस्य मा.श्री.सुरेशराव माने (संचालक,सहयाद्री सा.स. कायशवंतनगर) मा.श्री. परतंगराव माने (माजी उपाध्यक्ष, जि.प.सातारा), मा.श्री.विलासराव माने (स्कूलकमिटी सदस्य), मा.सौ. वनिता संतोष माने (पंचायत समिती सदस्य), मा. श्री. मोहनराव माने (माजीसभापती, बाजार उत्पन्न समिती, कराड), मा.श्री.देवदत्त माने (सरपंच, ग्रामपंचायत चरेगाव),मा.सौ.सारिका डुबल (उपसरपंच, ग्रामपंचायत चरेगाव), श्री.भिकोबा खालकर (थोर देणगीदार),मा.श्री.धनाजी येराडकर (अध्यक्ष, शाळ्य व्यवस्थापन समिती), मा.श्री. विजय सुर्यवंशी (माजी सरपंच,ग्रामपंचायत भोळेवाड़ी), मा. श्री. रणजीत थोरात, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापनव विकास समिती, विद्या समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सदस्य, चरेगाव पंचक्रोशातील सर्व प्रतिष्टठित ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. संजय ढाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक यांनी केले. सूत्रसंचालन श्री.अमितकुमार लोखंडे तर आभार गुरुकुल प्रकल्प्रमुख श्री. उमाजीघाडगे यांनी मानले.