कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासच उरले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारसाठीच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. त्यानंतर आता मिशन वोटिंगची सर्वत्र घाई सुरू झाली असून २६०, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने मतदानासाठी लागणारे साहित्य मतदान केंद्रनिहाय तयार ठेवण्यात आले आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात स्ट्रॉंगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट मशीन्स सकाळी बाहेर काढल्या जातील. त्यासोबत या पिशव्या घ्यायच्या, त्यातील साहित्य इथेच तपासायचे आणि आपापल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर निघायचे. असे पूर्ण नियोजन तयार झाले आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र. नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्या सहकार्याने निर्वीघ्नपणे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.