कराड प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारा व सांगली जिल्हयातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी एक सोयीस्कर गाडी सुरू करण्यात आलेली आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विशेष गाडी चालविली जात आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला यावर्षी सातारा व सांगली जिल्ह्यातून पंढरपूर जाण्यासाठी वारकरी लोकांना आणि विठ्ठल भक्तांना ही विशेष गाडी सोयीची झालेली आहे.
पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या या विशेष रेल्वेमध्ये जनरल तिकीट दर सेना ९५ रुपये, स्लीपर क्लास १९५ रुपये, ३ एसी ५१० रुपये, २ एसी ७१० असे तिकीट दराने आहे. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे बोर्डाकडून एक आषाढी महिन्यामध्ये वारकरी लोकांना आणि भक्त लोकांना ट्रेनची सुविधा झालेली आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांना या फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
प्रवाशानाची या विशेष रेल्वेचा लाभ घ्यावा : गोपाल तिवारी
रेल्वे बोर्डने ट्रेन क्रमांक ११०२८/११०२७ दादर पंढरपूर व्हाया मिरज आणि सातारापर्यंत ट्रेन सुरू केली आहे. सोमवार, मंगळवार आणि शनिवार ही सेवा उपलब्ध आहे. प्रवाशांनी आपले तिकीट बुक करून सोयीस्कर प्रवास करावा, असे आवाहन केले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.