मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारासह सांगली, कोल्हापूर रेल्वे स्थानकांना भेट कराडकडे मात्र पाठ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे – मिरज – बंगळुरू व मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही काम ७ ते ८ वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा वारंवार वाढवूनही याबाबत संबंधित ठेकेदार व रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रवासी संघटना, व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आदीनी रेल्वे प्रशासनाबाबत आक्रमक पावित्रा घेतल्याने याची गंभीर दखल घेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सातारासह, सांगली, कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकांना भेट देत कासवगतीने सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मात्र यावेळी वेळ नसल्याचे कारण देत यादव यांनी कराड रेल्वे स्थानकाकडे पाठ फिरवत सांगलीकडे रवाना झाल्याने येथील प्रवासी, व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी महाव्यवस्थापक यादव यांनी पुणे- मिरज-कोल्हापूर मार्गाची ‘विंडो ट्रेलिंग’ तपासणीही केली. यावेळी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, मुख्य अभियंता (बांधकाम) सुरेश पाखरे व शाखा अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, स्थानकावरील सुरू असलेल्या कामांसह नव्या एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत असलेल्या सातारा, सांगलीकरांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत, याबाबत लवकर निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही यादव यांनी दिली. मात्र कराड या सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या स्थानकाकडे रेल्वेचे नेहमीच दुर्लक्ष झाल्याने कराडकरांचा रेल्वे प्रवास ‘राम भरोसे’ झाला आहे.

यावेळी यादव हे सांगली रेल्वे स्थानकाची पाहणी करत असताना त्यांची सांगली येथील नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, गजानन साळुंखे, माजी नगरसेवक संतोष पाटील आदींनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वरील ग्वाही दिली. सातारा, सांगली ही जिल्ह्याची मुख्य ठिकाणे असूनही तर कराड व किलर्लोस्करवाडी हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्टेशन असूनही या ठिकाणी नव्या गाड्यांना एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळत नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. यावर यादव यांनी याबाबत रेल्वे प्रशासन नेहमीच सकारात्मक राहील, असे स्पष्ट केले.

भेट दिली नसली तर यादव यांना निवेदन देण्यात आले आहे : गोपाल तिवारी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सातारासह, सांगली, कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकांना नुकतीच भेट दिली. मात्र, त्यांनी कराडला भेट न देता थेट सतर्ला रवाना झाल्या. त्यांच्या दौऱ्यामध्ये कराडला भेट देण्याचे नियोजन होते. मात्र, त्यांनी कराडला भेट दिली नाही त्यामुळे त्यांना आम्ही कराड रेल्वे स्टेशनसंदर्भात असलेल्या मागण्यांचे निवेदन पाठवले असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.