कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर विशेष शुल्कावर एक एकेरी विशेष गाडी चालवणार आहे. अतिजलद एकेरी विशेष गाडी क्रमांक 01099 ही मंगळवार दि. २० रोजी सकाळी ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल.
या विशेष गाडीला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
या गाडीमध्ये १७ आईसीएफ डब्बे – एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ जनरल सेकंड क्लास असे असणार आहेत. तसेच 01099 एकमार्गी विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कावर आरक्षण बुकिंग सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.