सातारा प्रतिनिधी | अटल भूजल योजने अंतर्गत खटाव तालुक्यातील येणाऱ्या निढळ गावांमध्ये अटल जलराष्ट्रीय व्यवस्थापन कक्षाचे डायरेक्ट अँड ओ एस डी सेक्रेटरी डॉ. राघव लांगर, डायरेक्टर राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष डॉ. उमेश बालपांडे तसेच कृषी तज्ञ पी. सी कुमावत यांनी गावांमध्ये क्षेत्रीय भेट दिली. यावेळी हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
फळबाग लागवड करणारे शेतकरी, ठिबक सिंचन करणारे शेतकरी, व सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पवार, दिलीप तोरस्कर, यशवंत जाधव यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. राघव लांगर यांनी गावातील लोकांबरोबर संवाद साधला. पाणी बचतीच्या उपाययोजना व उपलब्ध पाण्याचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रगतशील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच अटल भूजल योजनेअंतर्गत गावामध्ये झालेल्या विविध कामांची माहिती उपसरपंच नवनाथ खुस्पे, श्रीकांत खुस्पे, विजय शिंदे, यांनी दिली. गावामध्ये झालेल्या रिचार्ज चा फायदा याबाबत त्यांनी माहिती दिली. पाणी पुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य व शेतकऱ्यांबरोबर व भुजल मित्र तसेच भूजल सखी यांच्याबरोबर चर्चा केली. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गावकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर रिचार्ज शाफ्ट व पाझर तलाव यांची पाहणी केली.
यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे विभागाचे आयुक्त डॉ. विजय पाखमोडे, सहसंचालक डॉ. प्रवीण कथने, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा नोडल अधिकारी अटल जलऋषीराज गोस्की , राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाच्या तज्ञ दिपाली पाटील व क्षमता बांधणी तज्ञ विनायक गार्डे व वरीष्ठ भू वैज्ञानिक प्रकाश बेडसे,
कृषी अधिकारी, सरपंच सौ. रेखा घाडगे, सौ. बायडाबाई ठोंबरे, सौ. राजश्री शिंगाडे, कैलास भोसले, ग्रामसेवक शशिकांत कचरे, तलाठी अमित हिरके, भुजल मित्र अजित वसव, अशोक खुस्पे, दिपक मोहिते, संतोष शिंदे, सिद्धम भिसे, स्वयंसेवक, जलसुरक्षक, अशा अंगणवाडी सेविका, महिला बचत गट प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.