सातारा प्रतिनिधी । कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ शौर्यदिनी भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भीमसैनिकांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, त्याचबरोबर अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि ‘जय भीम’ घोषवाक्य अशी विशेष सजावट करण्यात आली. दरम्यान, सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून २०७ वा शौर्य दिन अर्थात, क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर,प्रकाश खटावकर, वसंत गंगावणे व सुभाष सोनावणे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सचिव बी.एल.माने,वामन मस्के, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आदींनी दिनाचे महत्व विशद केले. सन १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ५०० वीरांनी २८,००० पेशव्यांचा पराभव केला होता. १९३८ अस्पृश्य महिलांची सभा झाली होती. १९४८ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित, ” the untochable” या ग्रंथाचे प्रकाशन झाले होते.१९७९ रोजी मंडल आयोग नेमण्यात आला. १०० वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिली होती.” असे शौर्य दिनाचे महत्व आहे.
यावेळी कार्यक्रमास रवींद्र भालेराव,विलास सावळे, रवींद्र बाबर,अश्विन भिसे, आदित्य बेले,सिद्धांत शिंदे,प्रतिक बनसोडे,रामदास वाघमारे, प्राची जावळे, लेखणी जावळे, स्नेहल जावळे,नितीन जावळे,वंचितचे शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, रमेश गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व भीमसैनिक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. नितीन जावळे आणि त्यांच्या परिवाराने पाणी व खाऊचे वाटप केले होते.ज्येष्ट सामाजिक नेते गणेश कारंडे यांनी स्वागत केले तर समितीचे उपाध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.