फलटणमध्ये किरकोळ वादातून दमदाटी, मारहाण; पोलिस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात किरकोळ वादातून दमदाटी आणि मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. येथील एकता गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिनी साउंड कॉम्पिटिशन स्पर्धेवेळी किरकोळ वाद झाला. १५ ते २० जणांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने, तसेच लोखंडी फायटरने मारहाण केली आहे. शिवीगाळ, दमदाटी, तसेच घराच्या आणि दुकानाच्या काचा फोडून लूटमार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज अमीर शेख (रा. बारवबाग फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि.१ डिसेंबरला सायंकाळी चार ते रात्री दहापर्यंत एकता गणेशोत्सव मंडळातर्फे मिनी साऊंड कॉम्पिटीशन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी हर्ष नलवडे याने अरबाज याच्याशी वाद घातला. त्यानंतर हर्ष नलवडे, नोहेल तांदळे, विशाल कुऱ्हाडे, संकेत गणेश कापसे, संकेत अलगुडे यांनी अरबाजला शिवीगाळ करून वाद घालू लागले. हर्ष याने त्याच्या हातातील पेपर स्प्रे अरबाज तसेच विशाल ठोंबरे, अब्बास शेख यांच्या तोंडावर मारला व नोहेल तांदळे, विशाल कुऱ्हाडे, संकेत कापसे, संकेत अलगुडे यांनी अरबाज यास हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

थोड्या वेळाने मारहाण करणारे हे अरबाजच्या राहत्या घरी आले व दरवाजावर दगड मारले व खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर पाच ते सहा दुचाकीवरून १५ ते १६ मुले आली. त्याचवेळी अरबाज यांच्या शेजारी राहणारे, तसेच अरबाजचे वडील अमीर शेख व त्यांच्या मित्रांनी तिथे भांडणे सोडविण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी व लोखंडी फायटरने मारहाण केली.

आकाश माने याने कोयता अरबाजच्या वडिलांच्या डोक्यात मारला; परंतु तो अरबाजच्या वडिलांनी हुकवला, त्या दरम्यान आकाश माने यांनी झटापट करून अरबाजच्या वडिलांचे दोन तोळ्यांचे सोन्याचे कैडे हिसकावले. त्याचवेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्र्त्यांनी डोळ्यांवर फायटर मारून खाली पाडून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व पाकीट जबरदस्तीने काढून घेऊन गेले. याप्रकरणी फिर्यादी अरबाज अमीर शेख (रा. बारवबाग फलटण) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.