सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत बीम लाईट लावल्याचा पारकर घडलं आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील पालिका चाैकातून गणेश मंडळाची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावण्यात आले. यामुळे पोलिसांनी महादेव आनंदा खापणे (रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला.
तसेच रात्री नऊच्या सुमारास गोडोली येथील तलाठीनगर येथेही मिरवणुकीत बीम लाईट लावण्यात आले होती. याप्रकरणी पोलिसांनी ब्रदर लाईट सिस्टीमच्या मालकाच्या विरोधात (पूर्ण नाव माहिती नाही) गुन्हा नोंद केला आहे. हे दोन्हीही गुन्हे सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाले आहेत. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.