सातारा प्रतिनिधी | मित्राकडून आपल्या घरी जात असताना वाटेत अडवून एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील तीन हजारांची रोकड लुटून नेल्याची घटना पोवई नाक्यावरील बीएसएनएल कार्यालयाशेजारी दि. २७ रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात 3 अनोळखींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षे शैलेंद्र जामदार (वय २२, रा. शाहूनगर, सातारा) हा मित्राच्या घरून दुचाकीवरून त्याच्या घरी निघाला होता. त्यावेळी बीएसएनएल कार्यालयाशेजारी थांबलेल्या तीन री तरुणांनी त्याला अडवले. त्यानंतर का त्याला मारहाण करून त्याच्या न खिशातील तीन हजार रुपयांची रोकड न्ड हिसकावून घेतली. तसेच त्याचा बाई मोबाइल घेऊन जमिनीवर आपटून ल फोडून टाकला. या प्रकारानंतर री संबंधित तरुण तेथून निघून गेले.
हर्षे जामदार याने या प्रकाराची न माहिती तातडीने सातारा शहर हा पोलिसांना दिली. त्याने पोलिसांना संबंधित तरुणांचे वर्णन सांगितले आहे. त्यानुसार पोलिस संबंधितांचा शोध घेत आहेत. या घटनेचा सहायक पोलिस निरीक्षक बिले हे अधिक एल तपास करीत आहेत.