यवतेश्वर घाटात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; कार पलटी होऊन युवक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर घाटात शनिवारी सकाळी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. पुण्याचा युवक दारू पिऊन चारचाकी गाडी चालवत होता. तोच गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात होऊन गाडी पलटी झाली. देव बलवत्तर म्हणून युवकाचे प्राण वाचले. सकाळी घाटात वाहनांची संख्या कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

पुण्याहून कास-यवतेश्वरला फिरण्यासाठी एक युवक शनिवारी सकाळी आला होता. फिरून पुन्हा सातारच्या दिशेने जाताना त्याने दारूचे सेवन केले. यामुळे यवतेश्वर घाटातील गणेशखिंडच्या परिसरात त्याचा चारचाकी गाडीवरील ताबा सुटला. आणि गाडी झाडाला जाऊन धडकल्याने पलटी झाली.

यात युवक जखमी झाला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. त्या युवकाला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून गाडी (एम एच १२ टी वाय ६६७८) ताब्यात घेतली. त्याला रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सकाळची वेळ असल्याने घाटात वाहनाची संख्या कमी होती. यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी त्या युवकावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.