सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील ठोसेघरला फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील पर्यटकांची कार साताऱ्याकडे येत असताना सज्जनगड जवळ दरीत कोसळली यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील काही पर्यटक काल गुरुवारी सातारा जिल्ह्यातील ठोसेघर येथे फिरण्यासाठी आले होते. याठिकाणी दिवसभर एन्जॉय केल्यानंतर ते आज सकाळी ठोसेघर येथून पुण्याकडे परत जायला निघाले. यावेळी ते त्याच्या गाडीतून सातारा मार्गे परत पुण्याकडे जात असताना त्यांची गाडी सज्जनगड फाटा जवळ आली. यावेळी येथून जात असताना त्यांच्या गाडीसमोर खड्डा कल्याने त्यांनी तो खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला. तो खड्डा चुकविताना त्यांची गाडी दरीत कोसळून अपघात झाला.
या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले. अपघातानंतर इतर नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी हलविले असून या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.