कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

0
341
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून नुकतीच सुरुवात करण्यात आली.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ महेश खलिपे, अति. शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोग अभिायान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर अभियानाकरिता राज्यस्तरावरुन कॅन्सर व्हॅन सातारा जिल्ह्यासाठी एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध झाली आहे.

सदर कॅन्सर व्हॅनच्या नियोजित वेळापत्रका प्रमाणे गावोगावी जाऊन तज्ञ वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत सदर भागातील नागरिकांची मोफत मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी कॅन्सर व्हॅन मध्ये करण्यात येणार आहे, याचा सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

या तपासणी शिबिरात आलेल्या नागरिकांना तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्ल्याने कर्करोगाशी संबधित वैद्यकिय तपासणी, चाचण्या, निदान निश्चिती करणे, मोफत उपचार, संदर्भ सेवा व पाठपुरावा आशा सेविका, एएनएम, प्रा.आ.केंद्र यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.