सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची (Satara Lok Sabha Election 2024) आचार संहिता जाहीर झाली आहे. या दरम्यान, आदर्श आचार संहितेचे कुणी भाग करू नये. जर केल्यास संबंधितांवर कडक कारवाई देखील केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग व प्रशासनाकडून 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला. तसेच “नागरिकांनी कोणतीही लाच स्वीकारण्यापासून दूर रहावे, जर कोणी लाच देत असेल अथवा मतदारांना धमकी देत असेल तर 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डूडी म्हणाले की, भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ ख नुसार, निवडणूक प्रक्रियेच्या काळात त्याच्या मतदानाचा हक्क वापरण्याकरिता व्यक्तीला प्रलोभन दाखवण्याच्या कोणतेही परितोषिक, रोख रक्कम किंवा या प्रकारचे देणारी किंवा स्वीकारणारी कोणतीही व्यकती एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्हीस, शिक्षापात्र असेल.
ज्याबाबी भारतीय दंड संहितेचे उल्लंघन करतील अशांवर एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्हीस शिक्षा पात्र असेल. लाच घेणारा व देणारा या दोहांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी आणि मतदारांना धमकी देणा-या व धाकदपटशा करणा-या विरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशीही माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.