महाबळेश्वरात घोड्यावरून जात असताना पडून बहीण-भाऊ जखमी; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी होते. परंतु शुक्रवार, दि. २६ रोजी एक कुटुंब महाबळेश्वरला फिरण्यास आले असता कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारांना ड्रेस कोड आहे; परंतु कोणीही युनिफॉर्म घालत नाही. घोडेवाले व पर्यटक यांच्या सतत वाद होतात. घोडेवाले पर्यटकांना घोड्यावर बसवून सोडून देतात, अशावेळी घोडा अनियंत्रित होतो आणि मग अपघात होतो. जखमी पर्यटकांची कोणीही साधी दखल घेत नाही. अपघाताचे प्रमाण वाढले असून, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालिका आणि पोलिस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाबळेश्वर शहर परिसरात १५० घोडे असून, घोडेस्वारी करतेवेळी हेल्मेट सक्तीचे करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

महाबळेश्वरमध्ये एप्रिल-मे हंगामास प्रारंभ झाला असून, लाखो पर्यटक महाबळेश्वरला येऊ लागले आहेत. दिवसभर पॉइंट भ्रमंती करून सायंकाळी पर्यटक वेण्णालेक येथे नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी येतात. दरम्यान, कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत जाब विचारला असता घोडेस्वाराने अर्वाच्य भाषेत पर्यटकास शिवीगाळ केली आहे.