सातारा पोलिसांची धडक कारवाई; 26 गुन्हे उघड करीत 39 लाख 9 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडी व १ चोरी असे एकुण २६ गुन्हे उघड करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३९ लाख ९ हजार ६०० रुपये किंमतीचे अर्थाकिलो पेक्षा अधिक ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त … Read more

सातारा जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत झाली ‘इतकी’ नोंदणी

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यभरात सुरु करण्यात आली असून सातारा जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी गतीने सुरू आहे. आतापर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी१ लाख १२ हजार ८४ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तींची पुर्तता करणाऱ्या महिलांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, … Read more

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची सर्वेक्षण मोहीम जिल्ह्यात जोमात; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्वच विभाग कामाला

Education Campaign News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरु राबविली जात आहे. दि. ५ जुलै रोजी पासून सुरु केलेली ही मोहीम दि. २० जुलैपर्यंत चालविली जाणार आहे. या मोहिमेची कडक स्वरूपात अंलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली असून त्यांच्या आदेशानंतर … Read more

पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात ऑईल सांडले; पुन्हा वाहतूक विस्कळीत

Khambatki Ghat News

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा घाट म्हणून खंबाटकी घाटाकडे पाहिले जाते. मात्र, घाटात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते. आज खंबाटकी घाटात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या रस्त्यावर ऑइल सांडल्याची घटना घडली. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी झाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ऑईलमुळे गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. शनिवार आणि … Read more

बांधवाटमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या मृत्यूमुखी

Patan News 6

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील बांधवाट आणि पाबळवाडी या गावांमध्ये तीन दिवसांत चार शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. बांधवाट येथे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी घरामागे असलेल्या शेडमधील दोन शेळ्या रात्री ९:३० वाजेच्या सुमारास बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तारळे परिसरातील काही गावे डोंगरावर, तर काही गावे डोंगर पायथ्याच्या परिसरात वसलेली आहेत. शेती … Read more

वन्य प्राण्यांसोबत रील करून Video शेअर कराल तर कोठडीची हवा खाल !

Karad News 16

कराड प्रतिनिधी । वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ हा पर्यावरण आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे वन्यजीवांचा छळ केल्यास किंवा बंदिस्त ठेवल्यास या कायद्यान्वये तो गुन्हा ठरतो. मात्र, काही जणांकडून ‘ट्रेंडिंग’मध्ये येण्यासाठी तसेच ‘लाइक्स’ आणि ‘शेअर्स’ वाढविण्यासाठी ‘हटके’ रील बनविण्याचा प्रयत्न केला जातो. काही जण त्यासाठी वन्यप्राण्यांच्या रील्स बनवून त्या सोशल मीडियावर प्रसारित करतात. मात्र, कायद्याने तो … Read more

कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna Rain News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दोन दिवस काही भागात पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी काहीशा प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. शनिवारी सकाळपर्यंत नवजा येथे 80 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 42 आणि महाबळेश्वरला 119 मिलीमीटरची नोंद झाली आहे. धरणात २२ दिवसांत १८ टीएमसीने पाणीसाठा वाढला असून धरणातील पाणीसाठा 34.60 टीएमसीवर … Read more

साताऱ्यात ‘या’ दिवशी सज्जनगड रन 2024 चे आयोजन

Satara News 46

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील मॅरेथॉनपटू नागरिकांसाठी सज्जनगड येथील श्री. समर्थ सेवा मंडळच्या वतीने दि. ११ ऑगस्टला सज्जनगड रन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या रनबद्दल माहिती देताना समर्थभक्त डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, “श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्याचा मंत्र द्यावा, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गजवडी (ता. सातारा) … Read more

सातारा पालिकेची पोवई नाक्यावरील अतिक्रमणावर धडक कारवाई

Satara News 20240713 100330 0000

सातारा प्रतिनिधी | पोवई नाक्यावरील टपाल कार्यालयाच्या सुशोभीकरणाला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हटविण्यात आली. सूचना देऊनही संबंधितांनी टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या न काढल्याने पालिकेला ही कारवाई करावी लागली. टपाल कार्यालयाने मुख्य इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी शासनाकडून अडीच कोटींचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यात रंगरंगोटी, संरक्षक … Read more

सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात; आतापर्यंत ‘इतक्या’ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण

Agriculture News 20240713 083209 0000

सातारा प्रतिनिधी | पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ८७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये … Read more

वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले; पाचगणीसह महाबळेश्र्वरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला

Venna Lake News 20240713 080403 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवारी सायंकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे आज अखेर ५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये ०१ जून ते ०१ जुलै या एका महिन्यात ८७०.६० मिमी (३४.२७ इंच ) पावसाची नोंद … Read more

मुलीशी झालेल्या वादातून युवकाला विवस्त्र करून चामडी पट्ट्याने जबर मारहाण, खंडाळ्यातील खळबळजनक घटना

Crime News 20240712 220840 0000

सातारा प्रतिनिधी | मुलीशी वाद झाल्याच्या कारणातून दोन अज्ञातांनी खंडाळ्यातील युवकास नग्न करून चामडी पट्टा आणि निरगुडीच्या काठीने जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच या घटनेचं संशयितांनी चित्रीकरणही केलं आहे. जखमी युवकावर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक मोहन वायदंडे (रा. खंडाळा), असं जखमी युवकांचं नाव असून याप्रकरणी दोन अज्ञातांवर खंडाळा … Read more