जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सालेन्स अवॉर्ड घोषित

Satara News 86

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड 2024 घोषित झाला आहे. लोकांची आणि देशाची सेवा करत असल्याबद्दल जितेंद्र डुडी यांचे अभिनंदन करून समाज आणि सार्वजनिक सेवेसाठी आपले कार्य अनेकांना प्रेरणा देणारे ठरेल अशा शब्दांत यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू आणि अरुण बोंगीरवार फाउंडेशनच्या अध्यक्षा लता बोंगीरवार यांनी … Read more

धोम कालवा दुरुस्तीस 50 कोटी द्या, अन्यथा पिकांचे नुकसान झाल्यास…; संघर्ष समितीची इशारा

Satara News 20241003 083053 0000

सातारा प्रतिनिधी | धोम धरण यंदा १०० टक्के भरल्याने पाणीटंचाई भासण्याची सुतराम शक्यता नाही; परंतु कालवा फुटी वा गळती झाल्यास गंभीर प्रसंग उभा राहू शकतो. तेव्हा, कालव्याचे अस्तरीकरण तथा दुरुस्तीसाठी मंजूर असलेला ५० कोटी निधी सोडून काम सुरू करावे, अन्यथा कालवा फुटून पाण्याचे, शेती पिकांचे नुकसान झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा धोम धरण संघर्ष समितीच्या … Read more

साताऱ्यात अजितदादांच्या कार्यक्रमात निम्मा मंडप रिकामा; महिलांनी भर कार्यक्रमातून घेतला काढता पाय

Satara News 20241003 073520 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. या कार्यक्रमासाठी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीती मंगळवारी झालेला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव … Read more

साताऱ्यात सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट, एक ठार, दोन गंभीर जखमी

Satara News 20241002 181743 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील माची पेठ भर दुपारी कॉम्प्रेसरच्या भीषण स्फोटाने हादरली. स्फोटामुळे घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. तसंच स्फोटाच्या आवाजामुळ परिसरात एकच खळबळ उडली. हा स्फोट नेमका कॉम्प्रेसरचा झाला की वाहनात गॅस भरताना झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. साताऱ्यातील माची पेठे परिसर मंगळवारी दुपारी सर्व्हिसिंग सेंटरमधील कॉम्प्रेसरच्या फोटाने हादरला. या स्फोटात एक जागीच … Read more

श्वानांची जत्रा आणि कारभारी भित्रा; साताऱ्यात सुशिक्षित तरुण करणार अनोखे आंदोलन

Satara News 20241002 141337 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदार संस्थेने निर्बिजीकरण प्रक्रियेत चालढकल चालवल्याचा ठपका सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी दि. 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारे पालिके समोर आंदोलन करणार असल्याची माहिती ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे. याबाबत वाघमारे म्हणाले की, आपण जे आंदोलन करणार आहोत. … Read more

साताऱ्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये मांडला गोट्यांचा डाव

Satara News 20241002 113118 0000

सातारा प्रतिनिधी | शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाजवळील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी ऑल इंडिया पँथर सेनेकडून खड्ड्यांमध्ये ‘गोट्या खेळो’ आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने वाहनधारकांचे लक्ष वेधून घेतले, शिवाय ते चर्चेचा विषयही ठरले. पावसाळा सुरू झाल्यापासून सातारा शहर व उपनगरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची … Read more

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी होणार सातारा जिल्ह्यात दाखल

Satara News 20241002 100540 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी (दि.४) सातारा जिल्ह्यात येत असून पहिल्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत व जिल्ह्यातील आजी, माजी आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी सकाळी ११ वाजता दहिवडी येथील बाजार पटांगणावर जाहीर सभा … Read more

अंत्यविधीला जाताना शेंद्रेजवळ कारची ट्रकला धडक; एक ठार तर पाचजण गंभीर जखमी

Car Accident News 20241002 080734 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे येथील नातेवाईकाच्याअंत्यविधीला जात असताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना मंगळवारी,दि.१ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारे शेंद्रे, ता. सातारा येथे घडली. दरम्यान, अपघातग्रस्त सांगली आणि चिपळूणमधील रहिवासी असून त्यांच्यावर … Read more

राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी केसुर्डीतील कंपनी व्यवस्थापकांसह दोघांना न्यायालयाने ठरवले दोषी

Crime News 20241002 074207 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले. तर प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद सुनावली. केसुर्डी येथे थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ३ मार्च … Read more

साताऱ्यातील स्मार्ट जलमापकांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

Satara News 20241002 064228 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना आणि पाणी वितरिका यांना स्मार्ट जलमापके बसवली जाणार आहेत. या कामाचा ऑनलाइन शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. हा कार्यक्रम सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात बुधवार, दि. २ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन या … Read more

सैदापुरातील पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 9.72 कोटींचा निधी मंजूर

Karad News 45

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महायुती सरकारने मान्यता दिली आहे. तसेच ९ कोटी ७२ लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास प्रारंभ होणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले … Read more

खासदार उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट; मराठा आरक्षणाबाबत चर्चा करीत दिले निवेदन

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत मराठा आरक्षण व जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच पाटण विधानसभा मतदार संघात उपस्थित राहून विकास कामांचे लोकार्पण केले. त्यांनी दमदार भाषण … Read more