झाडाणीतील 620 एकर जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायालयाकडून स्युमोटो याचिका दाखल

Satara News 56

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्यात गाजत असलेल्या महाबळेश्वरमधील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी नुकतीच साताऱ्यात अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीस गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतः उपस्थिती लावली. दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी गलांडे यांनी दि. २९ जुलैला सर्व कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले असून याच दिवशी या … Read more

सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पोलिसांकडून 36 हजाराचा दंड वसूल

Patan News 10

पाटण प्रतिनिधी । सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे. दरम्यान, चाफळ परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवत रविवारी कारवाई … Read more

पाटण तालुक्यात NDRF ची टीम दाखल; दरडग्रस्त, पूरग्रस्त गावांना दिली भेट

Patan News 9

पाटण प्रतिनिधी । मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन अर्लट झाले असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागास सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एनडीआरएफ टीम रविवारी दाखल झाली आहे. दरम्यान, या टीमने अतिवृष्टी, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी … Read more

पंढरपूर वारीसाठी सातारा विभागातून 215 जादा बसेस; 21 जुलैपर्यंत सेवा राहणार सुरू

Satara News 55

सातारा प्रतिनिधी । पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. दि. 21 जुलैअखेर सातारा विभागातील सर्व 11 आगारांतून 215 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूरचा यात्रा कालावधी दि. 13 ते 21 जुलै असा आहे. बुधवार, दि. 17 जुलै रोजी आषाढी … Read more

सातारा जिल्ह्यात 43 हजार 500 वृक्षांची लागवड; ‘इतक्या’ ग्रामपंचायतींनी केले उद्दिष्ट पूर्ण

Satara News 54

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिन ते जागतिक निसर्ग संवर्धन दिन या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत विविध ग्रामपंचायतींनी 43 हजार 501 वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये 105 ग्रामपंचायतींचे किमान 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत … Read more

मुसळधार पावसामुळे कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan Koyna News

पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर दिवसभरात रविवारी मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस रविवारी दिवसभर पडला. रविवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 40.43 टीएमसी इतका पाणीसाठा झाला … Read more

शेतात तुटलेल्या वीज तारेच्या धक्क्याने शेतकरी महिला जागीच ठार

Khandala News 20240715 074302 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील गुठाळवाडी येथे तुटलेल्या विद्युत वाहक तारेने शेतकरी महिलेचा बळी घेतला आहे. शेतातील काम संपवून घरी निघालेल्या महिलेचा तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. पार्वती यशवंत महांगरे (वय 60, रा. गुठाळवाडी ता. खंडाळा) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पार्वती व त्यांचे पती हे … Read more

जिल्ह्यात दमदार पाऊस; कोयना धरणातील पाणीसाठ्यात झाली ‘इतके’ TMC ने वाढ

Koyna News 4

पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून दिवसभरात मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाळा सुरुवात झाल्यानंतर रविवारी दुपारी काहीशी विश्रांती दिली. रविवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली आहे. सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 38.28 टीएमसी इतका पाणीसाठा … Read more

सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख मंजूर

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 26 ग्रामपंचायतींना आता नवीन इमारती मिळणार आहेत. कारण या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून … Read more

पावसाळ्यातील जनावरांच्या उध्दभवणाऱ्या आजारांबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘पशुसंवर्धन’कडून महत्वाचे आवाहन

Satara News 51

सातारा प्रतिनिधी । वातावरण बदल, पावसाचे पाणी व पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण न केल्यामुळे घटसर्प, फऱ्या, पीपीआर व आदी रोगांची जनावरांना लागण होते. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे माशा, डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. मात्र, जनावरांना आजाराची लागण झाल्याचे लक्षात येताच त्यांचे लसीकरण व उपचार करून घेणे आवश्यक आहे. घटसर्प, फऱ्या या आजारांची लागण होऊ नये म्हणून … Read more

कास पुष्पपठार शनिवार-रविवार सुट्टीमुळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल!

Kas Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील खास असे पर्यटनस्थळ म्हणून कास पुष्पपठारास ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटनाच्या आनंदासाठी देश- विदेशातील पावले पश्चिमेकडे वळून यवतेश्वर, कास, भांबवली, बामणोलीला पर्यटकांची गर्दी होत आहे. संततधारेमुळे मनमोहक निसर्ग खुणावत असून, पर्यटक मोठ्या प्रमाणावर कास परिसरात दाखल होत आहेत. शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्याने … Read more

राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी…; कराडात आ. सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

Karad News 23

कराड प्रतिनिधी । विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी “राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणाने केले जातील. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा प्रयत्न या आमदारकीच्या माध्यमातून करू,” असे महत्वाचे … Read more