गाडीची चावी आणण्यावरून झाला वाद अन् सैदापुरात दोन मित्रांमध्ये तुफान मारामारी

Crime News 20

कराड प्रतिनिधी । चायनीज सेंटर दुकानातील टेबलवर विसरलेली दुचाकीची चावी आणण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये जोरदार मारामारी झाली. यावेळी एकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील सैदापूर येथील ओम साई कॉम्प्लेक्सनजीक सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवारे येथील चौंडेश्वरीनगरमध्ये राहणारा बबन अण्णा शिवाजी स्टेडियमनजीक राहणारा सनी चव्हाण हे दोघेजण … Read more

सातारा, मिरज मार्गावरील 3 रेल्वे गाड्या रद्द केल्याने प्रवाशांचे झाले हाल

Railway News 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाचे सोमवार व मंगळवारी काम करण्यात आले. या कामामुळे या मार्गावरील तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात आल्या. गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे याचा रेल्वेच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सातारा व मिरज जादा एसटी सोडून रेल्वे प्रवाशांना सातारा व मिरज येथे पोहोचविण्यात आले. मात्र, सातारा … Read more

माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आज शंभूराज देसाईंच्या मतदार संघात, ‘त्या’ ठरावावर भाष्य करणार का?

Patan News 15

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुका दूध उत्पादक सहकारी संघाच्या नामकरणाचा कार्यक्रम आज सोनगाव लुगडेवाडी (ता. पाटण) येथे होत आहे. यानिमित्ताने माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या कार्यक्रमात शरद पवारांचे शिलेदार काय बोलणार?, याकडे कराड आणि पाटण तालुक्याचे लक्ष लागून … Read more

‘त्यांनी गाव तिथं परमीट रूम-बार सुरू करून पुरस्कार मिळवावे’; विलासबाबा जवळ यांची टीका

Satara News 2024 10 09T113153.950

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यात होणाऱ्या अवैध दारूविक्रीच्या आडून तालुक्यात मान्‍यताप्राप्‍त दारू दुकाने सुरू व्हावेत, असा खटाटोप करणाऱ्यांचीच भूमिका संशयास्‍पद आहे. त्यामुळे त्यांनी गाव तिथे परमीट रूम व बार सुरू करून पुरस्कार मिळवावे, अशी खरमरीत टीका जावळी तालुका व्यसनमुक्ती संघटनेचे संघटक विलास जवळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे. जावळी तालुका १६ वर्षांपूर्वी दारूबंदीच्या एका वैशिष्ट्यपूर्ण महिलांच्या … Read more

देवदर्शनाला जाताना झाला अपघात; पत्नी ठार तर पती गंभीर

Accident News 20241009 101708 0000

सातारा प्रतिनिधी | एक दाम्पत्य चौंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अचानक रस्त्यावर आलेल्या दुसर्‍या दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. रहिमतपूर ते तारगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी आरफळ कॉलनी परिसरात दाम्पत्याची दुचाकी बोलेरोवर आदळून अपघात झाला. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला आहे. सौ. कांचन भरत जाधव असे ठार झालेल्या पत्नीचे नाव … Read more

खोडशी नजिक महामार्गालगत थांबलेल्या फॉर्च्यूनर कारला टाटा नेक्सनची जोराची धडक

Car Accident News 20241009 090431 0000

कराड प्रतिनिधी | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर खोडशी गावनजीक थांबलेल्या फॉर्च्यूनर कारला पाठीमागून टाटा नेक्सनने जोराची धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात कारमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कराड लेनवर खोडशी नजीक फॉर्च्यूनर कार थांबली होती. यावेळी … Read more

शरद पवारांनी घेतल्या मुलाखती; साताऱ्यासह 3 जिल्ह्यातील 134 इच्छुकांनी दिली मुलाखत

Satara News 20241009 081656 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पश्‍चिम महाराष्ट्रातील चार ते पाच जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती पार पडल्या. सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या चार जिल्ह्यांसह पिंपरी चिंचवड शहर अशा ४० मतदारसंघातील सुमारे १३४ इच्छुकांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. आजी-माजी आमदार, जुने-नवे चेहरे, वादग्रस्त पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांसह सेना-भाजपशी संबंधीत काही नेत्यांचाही मुलाखत देणाऱ्यांमध्ये समावेश होता. विधानसभा … Read more

कराड उत्तरमध्ये एकाच व्यक्तीची तब्बल 462 बोगस ऑनलाईन अर्जांद्वारे मतदार नोंदणी, संशयित पोलिसांच्या ताब्यात

Karad News 20241009 063131 0000

कराड प्रतिनिधी | गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुमारे ३० अर्ज केल्याची घटना साताऱ्यातील वडूजमधून समोर आली होती. आता मतदार नोंदणीत असाच प्रकार उघडकीस आला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात वीज देयकात खाडाखोड करून एकाच व्यक्तीने तब्बल ४६२ ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला … Read more

नदीकाठची शेती जिरायत असते की बागायत? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजितदादांनी प्रांताधिकाऱ्यांना झापलं…

Karad News 20241008 215814 0000

कराड प्रतिनिधी | टेंभू योजनेच्या पाण्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या नदीकाठच्या शेतीची जिरायत नोंद घेऊन संपादनाचा कमी मोबदला निश्चित केल्याची बाब सुपने परिसरातील शेतकऱ्यांनी वाई दौऱ्यावेळी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे अजितदादा चांगलेच संतापले. कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना दादांनी फोनवरून झापलं. सुपने परिसरातील शेतकरी मोबदल्यापासून वंचित टेंभू उपसा योजनेच्या पाण्यामुळे नदीकाठावरील दोन्ही बाजूची शेती बाधित झाली आहे. टेंभूपासून … Read more

कृष्णा दिव्यांग मित्र योजना महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल : डॉ. सुरेश भोसले

Karad News 20241008 200723 0000

कराड प्रतिनिधी | समाजातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कृष्णा दिव्यांग मित्र योजना राबविली जात आहे. कृष्णा हॉस्पिटल आणि डॉ. अतुलबाबा युवा मंचने सुरु केलेल्या या योजनेचा लाभ कराड दक्षिणमधील शेकडो दिव्यांग बांधवांना होत आहे. येत्या काळात ही योजना महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले … Read more

ऊस दरासाठी बळीराजा संघटना उद्या करणार कराड तहसीलदार कार्यालयासमोर खर्डा भाकरी आंदोलन

Karad News 67

कराड प्रतिनिधी । ऊस दरासाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी कराड येथील तहसील कार्यालयात जाऊन उद्या दि. ९ रोजी खर्डा भाकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश दादा शेवाळे, जिल्हाध्यक्ष … Read more

फलटण परिसरात जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणारी 4 जणांची टोळी दोन वर्षाकरीता तडीपार

Crime News 19

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांकडून नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका परिसरातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणाऱ्या ४ इसमांच्या टोळीला पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. टोळी प्रमुख १) तौफिक इम्तियाज कुरेशी, (वय २३) टोळी सदस्य २) इलाही हुसेन कुरेशी, (वय २५) ३) अरबाज इम्तियाज कुरेशी, (वय २८), ४) इनायत … Read more