कराडात ‘बळीराजा’चे खर्डा-भाकरी आंदोलन; कारखानदारांचा निषेध करत प्रशासना विरोधात घोषणाबाजी

Karad News 73

कराड प्रतिनिधी । ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये मिळावा. तसेच चालू हंगामाची उचल चार हजार रुपये मिळावी, या मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी कराड येथील तहसील कार्यालयासमोर खर्डा-भाकरी आंदोलन करण्यात आले. यावेळी साखर कारखानदारांचा व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, सातारा … Read more

काँग्रेसला माण सोडाच, भाजप परत दिसणार नाही; केंद्रीय निरीक्षकांपुढे जोरदार मागणी

WhatsApp Image 2024 10 10 at 10.52.34 AM 1

सातारा प्रतिनिधी | काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत माण विधानसभा मतदारसंघाची मागणी अनेकवेळा झाली असून, बुधवारीही माढा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षकांकडेही माणची मागणी जोरदार करण्यात आली. तसेच या मतदारसंघात काँग्रेस लढली तर विजयी होईल. पण, भाजप परत दिसणारही नाही, असा दावाही करण्यात आला. यामुळे माण मतदारसंघ काँग्रेसला मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीचे … Read more

साताऱ्यात काॅंग्रेस पदाधिकाऱ्याच्या खात्यावर लाडकी बहिण चे चुकून जमा झाले पाच हप्ते

Satara News 20241010 051511 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत अनेक गंमतीजंमती घडत असून सातारा जिल्ह्यात तर काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या बंद असणाऱ्या बॅंक खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत. ही घटना देसाई यांच्यासाठीही आश्चर्यकारक ठरली आहे. राज्य अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना … Read more

‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ लढवणार निवडणूक

Satara News 20241009 215104 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्यावतीने राज्यभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. आज बुधवारी शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्यातील सात मतदारसंघासाठी निरीक्षक प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी ५८ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी वंचितचा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवाराची घोषणा करण्यात आली. वंचित बहुजन पक्षाच्या वतीने माणमधून इम्तीयाज नदाफ यांना उमेदवारी देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय … Read more

पाटणमध्ये जाऊनही कराड उत्तरच्या आमदारांचा शांत अन् संयमी पवित्रा; देसाई कारखान्याच्या ‘त्या’ ठरावावर बाळगल मौन

Patan News 16

पाटण प्रतिनिधी । “आमच्या कार्यक्षेत्रात कोणी ढवळाढवळ करू नये,” असा इशारा देऊनही पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या (Shambhuraj Desai) लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने वार्षिक सभेत सह्याद्रि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदत्व देण्याचा ठराव घेतला. त्यावर आमदार बाळासाहेब पाटलांनी (Balasaheb Patil) पाटणमधील कार्यक्रमात चकार शब्द न काढता आपल्या शांत आणि संयमीपणाचे दर्शन घडवले. पाटण तालुका दुध उत्पादक सहकारी संघाचं नामकरण … Read more

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार; कोरेगावात ‘या’ माजी मंत्र्याने केले महत्वाचे विधान

Satara News 2024 10 09T192214.983

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी व रणनीतीसंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य व कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव तालुका काँग्रेस समितीची सभा नुकतीच पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. तशा प्रकारचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत असल्याचे महत्वाचे विधान माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी … Read more

जिल्ह्यातील ‘या’ 32 इच्छुक उमेदवारांनी पवार साहेबांना घातलं साकडं; म्हणाले, माझ्या रूपाने आपल्याला आमदार…

Satara News 2024 10 09T175639.048

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ३२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काल मंगळवारी (दि. ८) रोजी पुणे येथे खुद्द पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतल्या. खासदार पवार यांनी इच्छुकांचा अजेंडा, जाहीरनामा जाणून घेतला. यावेळी “आम्ही अनेक वर्षांपासून मतदारसंघात तयारी करत असून, एकदा संधी द्या…माझ्या रूपाने एक आमदार नक्की आपल्याला मिळेल,” असा विश्वास … Read more

शरद पवार गटाच्या अभयसिंह जगतापांचा गोरेंवर निशाणा; म्हणाले की, आडनाव गोरे आणि धंदे काळे

Satara News 2024 10 09T171832.409

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप (Abhaysinh Jagtap) यांनी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहातील नुकतीच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर निशाणा साधला. “आडनाव गोरे आणि धंदे काळे असणाऱ्या आ. जमीनकुमार चोरेंना महिलांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या शरद पवार यांच्यावर बोलायची … Read more

विधानसभेसाठी पाटण, कराड दक्षिण-उत्तरेत प्रशासन अलर्ट; भरारी पथकांसह व्हिडीओ सर्वेक्षण पथके स्थापन

Karad News 71

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासन सध्या चांगलेच सतर्क झाले आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, विविध विभागांतील अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच दिलेले कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दिल्या आहेत. नुकतेच तयार करण्यात आलेल्या भरारी पथकांमध्ये मनुष्यबळ … Read more

पालकमंत्री, आमदार असूनही उरमोडीचे पाणी निनामला का देता आलं नाही; धैर्यशील कदम यांचा बाळासाहेब पाटलांवर निशाणा

Karad News 69

कराड प्रतिनिधी । उरमोडी धरणातील पाणी आपल्या सातारा तालुक्याला २.५ टीएमसी इतके मंजूर आहे. हे पाणी बांधापर्यंत कुठं पोहचत आहे? का थांबलंय? १५ वर्षे आमदार होते. अडीच वर्षे पालकमंत्री असून देखील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. आता कुठलं मंत्रिपद दिल्यानंतर हे पाण्याचा प्रश्न सोडवतील, असा टोला यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyashil Kadam) यांनी … Read more

गाडीची चावी आणण्यावरून झाला वाद अन् सैदापुरात दोन मित्रांमध्ये तुफान मारामारी

Crime News 20

कराड प्रतिनिधी । चायनीज सेंटर दुकानातील टेबलवर विसरलेली दुचाकीची चावी आणण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये जोरदार मारामारी झाली. यावेळी एकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील सैदापूर येथील ओम साई कॉम्प्लेक्सनजीक सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवारे येथील चौंडेश्वरीनगरमध्ये राहणारा बबन अण्णा शिवाजी स्टेडियमनजीक राहणारा सनी चव्हाण हे दोघेजण … Read more

सातारा, मिरज मार्गावरील 3 रेल्वे गाड्या रद्द केल्याने प्रवाशांचे झाले हाल

Railway News 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाचे सोमवार व मंगळवारी काम करण्यात आले. या कामामुळे या मार्गावरील तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात आल्या. गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे याचा रेल्वेच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सातारा व मिरज जादा एसटी सोडून रेल्वे प्रवाशांना सातारा व मिरज येथे पोहोचविण्यात आले. मात्र, सातारा … Read more