रत्नागिरी – साताऱ्याला जोडणाऱ्या ‘या’ घाटाचा कोसळला रस्ता; तब्बल 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

Ratnagiri Satara News

सातारा प्रतिनिधी । सध्या पश्चायम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्याच्या आणि घाटाच्या नागमोडी छोट्या रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटामध्ये रस्ता खचून रस्त्याला मोठे भागदाड पडण्याची घटना आज सकाळी घडली. रस्त्याचा एक भाग हजारो फूट खोल दरीत कोसळल्यामुळे सातारा जिल्ह्यातील घाटाच्या पलीकडील तब्बल ४० गावांचा … Read more

मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 68.82 TMC पाणीसाठा

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना धरणात सुद्धा पाण्याची झपाट्याने वाढ होत असून आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणाने 60 टीमसीचा टप्पा ओलांडला असून कोयना धरणाचा पाणीसाठा 68.82 टीएमसी झाला आहे. दरम्यान, कोयनेला … Read more

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीमध्ये सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म नोंदणीत 2 लाख 84 हजार 218 फॉर्मची नोंदणी करून सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. या योजनेसाठी घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई … Read more

सातारा जिल्ह्यात आल्याचा प्रश्न पेटला…! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आले वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड

Satara News 20240724 093646 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा सांगली औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करूनच आल्याची खरेदी केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत … Read more

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत घरी आलेल्या एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Karad News 20240723 222622 0000

कराड प्रतिनिधी | हद्दपारीचा आदेश असताना देखील पिस्तूल घेवून घरी आलेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कराड शहरातील रेठरेकर कॉलनीमध्ये पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी ही धडक कारवाई केली. निशिकांत निवास शिंदे (रा. रेठरेकर कॉलनी, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड शहरातील रेठरेकर कॉलनीतील निशिकांत शिंदे … Read more

कोयनानगरला सर्वाधिक 244 मिलीमीटर पाऊस; मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Koyna Rain News 20240723 205805 0000

पाटण प्रतिनिधी | पश्चिम घाटक्षेत्रात आठवड्या भरापासून सुरु असलेल्या सलग पावसाने जलचित्रच पालटले आहे. आजवरच्या सरासरीपेक्षा हा पाऊस जवळपास १५ टक्क्यांनी ज्यादाचा राहताना, चिंताजनक जलसाठे तुलनेत समाधानकारक स्थितीत आहेत. पावसाने जनजीवन विस्कळले असून, रस्ते, सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांना नद्यांना पूर येण्याची धास्तीही लागून राहिली आहे. गेल्या २४ तासात कोयनानगरला सर्वाधिक २४४ मिलीमीटर पावसाची … Read more

चाफळ भागात मुसळधार पाऊस; उत्तरमांड धरण पूर्ण क्षमतेने भरले

Uttarmand Dam News 20240723 203400 0000

कराड प्रतिनिधी | गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाटण तालुक्यातील गमेवाडी – चाफळ येथील उत्तर – मांड धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. चाफळ विभागापासुन ते उंब्रज पर्यंतच्या जवळपास अडीच हजार एकर शेती सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान या वरदाई व महत्वकांक्षी ठरलेल्या गमेवाडी(चाफळ) … Read more

लोणंदमधील खुनाचे गूढ उकलले; कोणतेही धागेदोरे नसताना 4 दिवसात आरोपीस अटक

Crime News

सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशनचे गार्डनमध्ये एका अनोळखी इसमास अज्ञात आरोपीने त्याचे डोक्यात फरशी व सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक डोक्यात मारुन त्याचा खून केल्याची घटना दि. १५ रोजी घडली होती. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील आरोपींना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार; कोयना धरणात 66.17 TMC ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असून आज सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 66.17 टीमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयनेला 61 तर नवजा येथे 37 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 58 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक झाल्यामुळे पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गेल्या … Read more

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपाधारकांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । पावसाळयात इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी गेल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होऊन पंपचालक व वाहनधारक यांच्यामध्ये वाद होत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान पेट्रालियम कार्पोरेशन लि., इंडियन ऑईल कार्पोरेशन लि., भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. या सर्व कंपनीचे सेल्स ऑफीसर यांना सातारा जिल्हयातील सर्व पेट्रोल पंपाचे भूमिगत टाकीची तात्काळ तपासणी करून त्यामध्ये पावसाचे पाणी … Read more

वाघजाईवाडीत भिंत खचून 2 जनावरे मृत्युमुखी; पाटण प्रशासनाचा तात्काळ मदतीचा हात

Patan News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या पर्वतराजीत धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस मुसळधार सुरू असल्याने कोयना धरणात आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, पाटण तालुक्यात कुठे अंगणवाडीची तर कुठे घराच्या इमारतिची पडझड होत असल्याच्या घटना घडत आहेत. पाटण तालुक्यातील वाघजाईवाडी येथील गणपत खाशाबा पवार यांच्या जनावरांच्या शेडची भिंत पावसामुळे … Read more

नवीन महाबळेश्वर प्रकल्पास जावळीसह महाबळेश्वरमधून विरोध; ‘या’ गोष्टींवर झाली महत्वाची चर्चा

new Mahabaleshwar project News

सातारा प्रतिनिधी । राज्य सरकारने नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आणि हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे पर्यावरण, वन्यजीव व जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी होणार हे स्पष्ट असल्याने या प्रकल्पास विरोध करून तो रद्द करण्याची मागणी मेढा व महाबळेश्वर येथील नवीन महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्र … Read more