शरद पवार हे सर्वात श्रेष्ठ मग त्यांनी मराठा आरक्षणावर…; साताऱ्यात उदयनराजेंनी पुन्हा डागली टीकेची तोफ

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज साताऱ्यात पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. ‘यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा ठामपणे म्हणणाऱ्यांचं काय झालं? यशवंतराव चव्हणांच्या विचारांचं काय झालं? सगळी कामं मार्गी … Read more

विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; कराडात आजी-माजी सैनिकांसह सर्व सैनिक संघटनांचा ठराव

Karad News

कराड प्रतिनिधी । सैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह शेतकरी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील जागाही माजी सैनिक लढवणार आहेत, अशी माहिती सैनिक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. कराड येथे आजी माजी सैनिक फेडरेशनच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सैनिक फेडरेशनसह जिल्ह्यातील आजी-माजी … Read more

जिल्ह्यात 4 हजार ग्राहकांना नकोय नवीन वीजजोडणी

Satara News

सातारा प्रतिनिधी । वीजबिल थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संपूर्ण व्याज व विलंब आकार शुल्काची माफी असलेल्या महावितरण अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा फायदा घेत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीला प्राधान्य देत ४ हजार ११४ ग्राहकांनी नवीन वीजजोडणी नको असली, तरी ५ हजार ५८३ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे. दि. ३१ मार्च २४ पर्यंत थकबाकीमुळे … Read more

गुलाबी जॅकेट घालणाऱ्यांनी गुजरातच्या गुलामगिरीची झूल पांघरली ‘; अमोल कोल्हेंचा अजितदादांवर निशाणा

Satara News 2024 10 17T161300.631

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई येथील चित्रा टॉकीजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पार पाडली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या उमेदवारावर सडकून टीका केली. आपल्या समोर महायुतीचा उमेदवार कितीही तगडा आणि मातब्बर असला, तरी त्याला घरपोच करण्याची मनात इच्छा आणि आपली एकजूट असेल, तर वाई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. … Read more

भाजपकडून साताऱ्यातील मतदारसंघनिहाय आढावा; ‘या’ महत्वाच्या चार मतदारसंघांवर लक्ष

Satara News 2024 10 17T152243.601

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात निकटीचा अविधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे. तसेच आचारसंहिता देखील लागू झाली असून हि आचार संहिता लागू होताच विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याकरिता भाजपची जिल्हा कार्यकारणी सक्रिय झाली आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार बूथप्रमुख, शक्तीप्रमुख व मंडलप्रमुख यांनी आपापल्या रचना बळकट करून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला जात आहे. निवडणुकीच्या … Read more

फलटणमध्ये लोकशाही बळकटीसाठी मतदान करा : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले

phalatan News 4

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यकाल प्रसिद्ध केला असून, मंगळवारपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पडेल. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा व या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी … Read more

जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; ते तर पक्षाचे अध्यक्ष…

Karad News 84

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत मोठं विधान केलं. “विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. “जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत’.” असे पवार यांनी यावेळी म्हंटले. प्रदेशाध्यक्ष … Read more

कोयना धरणातून पुन्हा 1,050 क्युसेक विसर्ग; पावसामुळे धरणात वाढली आवक

Koyna News 6

पाटण प्रतिनिधी । सातारा सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस अजूनही पडत असून पश्चिमेकडील कोयना धरणात दोन दिवसात पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी दुपारी एक युनिट सुरू करून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कोयना धरणात … Read more

कराडजवळ 3 कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, निम्मी रोकड, वाहनांसह 2 संशयित ताब्यात

Crime News 25

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर कारमधील तीन कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कराड शहर पोलिसांना यश आलं आहे. टोळीचा म्होरक्या हा कराडमधील असून तो रेकॉर्डवरील गुंड आहे. तसेच अन्य काही संशयित कोयना काठच्या गावातील आहेत. गुन्ह्यात वापरलेली वाहने, लुटलेल्या रक्कमेतील निम्मे पैसे आणि दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुख्य संशयिताच्या तपासासाठी … Read more

आचारसंहिता लागू होताच सातारा शहर फ्लेक्समुक्त; पालिकेची पंचवीस जणांना नोटीस

Satara News 2024 10 17T104839.443

सातारा प्रतिनिधी | पालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले २५ फ्लेक्स बोर्ड बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून जप्त करण्यात आले. संबंधित फ्लेक्सधारकांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रति १० हजार रुपये सेवा शुल्क वसूल केले जाणार आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी दिली. सातारा शहरात फ्लेक्स लावण्यासाठी पालिकेकडे … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘आपत्ती व्यवस्थापन’ला तब्बल 125 कोटींचा निधी

Satara News 20241017 083448 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील दरडप्रवण, पूर प्रवण आणि दुष्काळी भागात विविध सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाला विविध ११५ प्रकारच्या कामांना मंजुरी देत तब्बल १२५ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे लवकरच दरड, पूर व दुष्काळी भागात लोकवस्तींच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांची कामे सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील सातारा, वाई, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांत दरड कोसळण्याचे व … Read more