फलटण तालुक्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा फैलाव

Satara News 20240915 093030 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर आणि तालुक्यात डेंग्यू, गोचीड ताप, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे साथरोग नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, नगरपालिकेचे स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने साथरोग वाढत आहेत. जून महिन्यांपासून झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे, साठलेले पाणी, न उचललेला कचरा, खड्डेमय रस्त्यावर साचत … Read more

माण तालुक्यात तृतीयपंथीयाचा खून, हातावर गोंदलेल्या नावावरून सहा तासात संशयितास अटक

Satara Crime News 20240915 082805 0000

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील तृतीयपंथीयाचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात गुन्याचा छडा लावला. माण तालुक्यातील तृतीयपंथीयाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघडकीस आला आहे. म्हसवड पोलिसांनी मृताच्या हातावरील गोंदलेल्या नावावरून संशयिताला बेड्या ठोकल्या. राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे, असं खून झालेल्या … Read more

अडीच वर्षात 52 हजार लोकांवर हल्ला! 10 जणांचा मृत्यू

Satara News 20240914 212758 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ३३ जणांना चावा घेतल्याची घटना आता घडली असलीतरी मागील अडीच वर्षांत जिल्ह्यातील ५२ हजारांवर नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला झालाय. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चावा घेणाऱ्या कुत्र्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे. मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत … Read more

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसची आज झाली चाचणी; तिकीट दर किती?

Satara News 20240914 182602 0000

कराड प्रतिनिधी | कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात एक मोठं अपडेट समोर आलंय. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. ठिकठिकाणी प्रवाशांनी ‘वंदे भारत’वर फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. कराड … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी, शेळी विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. दिनकर बोर्डे

Satara News 20240914 172042 0000

सातारा प्रतिनिधी | पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी १ गुंठा जागा खरेदी अनुदान व १०० परसातील कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यामधून भज (क) प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज 26 सप्टेंबर पर्यंत करावे, असे आवाहन जिल्हा … Read more

आमदार शिवेंद्रराजे अनेक वर्षांनी जलमंदिर पॅलेसमध्ये, उदयनराजेंना दिलं हे ‘गोड’ गिफ्ट!

Satara News 20240914 114018 0000

सातारा प्रतिनिधी | भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय खलबते झाली‌. अनेक वर्षानंतर आ.शिवेंद्रराजे भोसले जलमंदिर पॅलेसमध्ये आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सातारच्या राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू आहे. या भेटीत बाबाराजेंनी उदयनराजेंना त्यांच्या आवडीचं कॅडबरी चॉकलेटही दिलं. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे काही दिवसापूर्वी आजारी होते. … Read more

मुंबई-कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ लवकरच; आज एक्स्प्रेसची ट्रायल रन पार पडणार

Satara News 20240914 110313 0000

सातारा प्रतिनिधी | मुंबई – कोल्हापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मिरज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे यांना मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान दिली. त्यामुळे मिरज आणि कोल्हापूर फास्ट ट्रॅकवर येणार आहे. दरम्यान, आज (शनिवारी) मिरज-पुणे-मिरज वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन पार पडणार आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या … Read more

सातारचे दोन्ही ‘बिग बॉस’ जलमंदिर पॅलेसमध्ये एकत्र; उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचं झापूक झुपुक…

Satara News 20240914 091132 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षांपासून सातारच्या राजकारणात आमने-सामने असणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले काल एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आमदार शिवेंद्रराजे यांनी प्रथमच उदयनराजेंची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली. काहीवेळ चर्चा झाल्यानंतर शिवेंद्रराजे गाडीत बसलेले असताना उदयनराजेंनी हातात गाडीचे स्टेअरिंग घेतले होते. यावेळी शिवेंद्रराजेंनी बिग बॉसमधील झापुक झुपुक गाणे लावले. गाणे … Read more

ईद आणि अनंत चतुर्थी दिवशी मद्यपान बंदी दिवस घोषित करा; सुशिक्षित बेरोजगार संघटनेची मागणी

Satara News 20240913 212818 0000

सातारा प्रतिनिधी | दि. १६ सप्टेबर २०२४ रोजी ईद-ए-मिलाद व दिनांक १७ रोजी अनंत चतुर्थी आहे. त्यामुळे त्यादिवशी शासनाकडून मद्यपान बंदी दिवस (ड्राय-डे) घोषित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी केली आहे. प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ईद आणि अनंत चतुर्थी साजरी करण्यास दोन्ही समाजातील समाज … Read more

आरक्षण रद्द करू म्हणणाऱ्या राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारून भाजपने केला निषेध

Satara News 20240913 201356 0000

सातारा प्रतिनिधी | राहुल गांधीनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. राहुल गांधींनी अमेरिकेत मुलाखतीमध्ये भारतातले आरक्षण बंद केले पाहिजे, असे वक्तव्य केले. त्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे सांगत साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला. लोकसभेच्या वेळेला, “संविधान खतरेमे”, “भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार, अशी … Read more

याला म्हणतात प्रामाणिकपणा! भंगार गोळा करणाऱ्या महिलेने परत केली लाखो रुपयांची सोन्याची माळ

Karad News 20240913 192155 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रीतीसंगम परिसरात गणेश विसर्जन करताना कराडमधील गोठे येथील अधिकराव दिनकर पवार यांच्या गणेशाच्या गळ्यातील दहा तोळ्याची सुमारे आठ लाख रुपये किंमती माळ नदीत पडली. ही माळ त्याठिकाणी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहा फकीर यांना सापडली. ही माळ त्यांनी सोनारामार्फत पोलिसांना संपर्क करून माळ अधिकराव यांना परत केली. नूरजहा यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र … Read more

फलटणमध्ये प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध; पोलीस निरीक्षक शहांनी दिली महत्वाची माहिती

Phaltan News 20240913 181619 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयात दि. ०७ सप्टेंबर ते दि. १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या दरम्यान सातारा जिल्हयात अनंत चतुदर्शी दरम्यान गणेश मुर्तीचे विसर्जन होते व सदर विसर्जन मिरवणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सातारा जिल्हयामध्ये प्लाझमा, बीग लाईट आणि लेझर … Read more