शरद पवार पावसात भिजले अन् उन्हात उभे राहिले काय? कराड उत्तरेत मात्र परिवर्तन अटळ – धैर्यशील कदम

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । पस्तीस वर्षे आमदारकी ज्यांच्या घरात आहे अशांनी काम काय केल?, हणबरवाडी, धनगरवाडी योजना हे स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांचे स्वप्न होते. पंचवीस वर्षे आमदार त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असून ज्यांना स्वत:च्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आलं नाही ते कराड उत्तरचे स्वप्न काय पूर्ण करणार? हे जनतेला फसवत आहेत हे मतदारसंघात लक्षात आलं आहे. … Read more

…तर पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा स्वबळावर लढवणार; साताऱ्यात आरपीआय गटाच्या नेत्यानं दिला थेट इशारा

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाची वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. महायुती सरकारने मागासवर्गीय समाजाचा निधी अन्यत्र वळवला आहे. त्यामुळे आमचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदेश दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागा स्वबळावर लढवण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी दिला आहे. साताऱ्यात रिपाइंच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची … Read more

सातारा विधानसभेसाठी निवडणुक विभागाकडून 20 नवीन मतदान केंद्रे; मतदान केंद्रांवरील बंदोबस्तासाठी 464 पोलिसांची नियुक्ती

Satara News 17

सातारा प्रतिनिधी । सातारा विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात 20 नवीन केंद्रे निर्माण झाली आहेत. निवडणुकीसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून, मतदान केंद्रांवरील बंदोबस्तासाठी 464 पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 41 हजार 408 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल 1 कोटीची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

Satara News 20241020 095747 0000

सातारा प्रतिनिधी | महिन्याला साडेसहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 39 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा व पुण्याच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शंकर पंडित (मूळ रा. नायकाचीवाडी, बाकेश्वर, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. दुबई), श्रीकांत सुदाम मोरे (देहूगाव येलवाडी, ता. हवेली, जि. पुणे) व दत्तात्रय बबन देशमुख (रा. … Read more

कराडातील 3 कोटींच्या दरोड्याचा पोलीसांकडून उलगडा; 24 तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

Satara News 20241020 080109 0000

कराड प्रतिनिधी | मलकापूर, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 15) मध्यरात्री 1.30 च्या सुमारास एका कारमधून तीन कोटी रुपयांची रोकड लुटणारी दहा जणांची टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक … Read more

‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी 16 उमेदवार; कराड दक्षिण अन् कोरेगावच्या उमेदवारांची घोषणा!

Satara News 20241020 065112 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी गत महिन्याच्या सुरुवातीला ‘वंचित’ ने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर काल पुन्हा आणखी १६ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. कराड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत ‘वंचित’चे जिल्ह्यात तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. … Read more

साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण, माओवाद्यांशी लढताना आयडी स्फोटात शहीद

Satara News 20241019 212229 0000

सातारा प्रतिनिधी | छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना आज घडली आहे. शहीद जवानामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथील सुपुत्र अमर शामराव पवार यांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतर बावडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगड या ठिकाणी नारायणपूर जिल्ह्यात ओरचा भागातून माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवण्यासाठी डीआरजी … Read more

सातारा जिल्ह्यातील पाणी टंचाई संपली; तहान भागवणारे टँकर झाले बंद

Satara News 20241019 205004 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळामुळे सुरू झालेले टँकर वर्षभरानंतर बंद झाले. गुरूवारी माण तालुक्यात टँकरची शेवटची फेरी झाली. तर यावर्षी मे महिन्यात २१८ गावे ७१६ वाड्या वस्त्यांसाठी २०८ टँकरचा धुरळ उडत होता. जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अवघे ६५ टक्केच पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे पूर्व दुष्काळी भागातील तलाव, विहिरी ही कोरड्या होत्या. तर पश्चिम भाग … Read more

थोरल्या पवारांनी पुन्हा डाव टाकला; रणजितसिंग मोहिते पाटलांच्या हाती तुतारी, आमदारकीचा दिला राजीनामा

Satara News 16

सातारा प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून महायुतीत जागा वाटप सुरु आहे. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार (Sharad Pawar)यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला आहे. विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी आपल्या आमदारकी आणि भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आजच सायंकाळी राष्ट्रवादी … Read more

कराडातील सराईतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीतील तिघेजण 2 वर्षाकरीता तडीपार

Satara News 15

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड शहर परिसरातील शरिराविरुध्दचे/मालमत्तेविरुध्दचे सराईतपणे गुन्हे करणाऱ्या ३ इसमांच्या टोळीवर सातारा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. टोळी प्रमुख १. बजरंग सुरेश माने, (वय ३०, रा. बुधरवार पेठ, कराड), २. चेतन शाम देवकुळे (वय २६, रा. १६८, महात्मा फुलेनगर बुधवार पेठ, कराड), … Read more

अजितदादांच्या संभाव्य यादीत वाईतून मकरंद पाटलांना उमेदवारी; साताऱ्यातील 8 विधानसभा मतदार संघापैकी एकच हाती

Satara News 10

सातारा प्रतिनीधी । विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेल असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी बाहेर आली आहे. यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं असून यादीत वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा समावेश आहे. हातातून गेलेल्या बालेकिल्ला साताऱ्यातील वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील (Makarand Patil) निवडणूक … Read more

विधानसभेला लढायचं की पाडायचं? दोन दिवसांत ठरणार; जरांगे पाटलांच्या निर्णयाची सातारकरांना प्रतीक्षा

Satara News 9

सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीतील नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली गेली नसल्याने आक्रमक झालेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी थेट निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराच दिला आहे. यापूर्वी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आणि सातारा जिल्ह्यातही याचा प्रत्यय आला. त्यानंतर विधानसभेबाबत काय करायचे? याबाबत जरांगे-पाटील उद्या … Read more