माणचा ‘मान’ कुणाला द्यायचा? शरद पवारांची इच्छुकांशी तासभर चर्चा

Satara News 20241021 103948 0000

सातारा प्रतिनिधी | माण-खटाव विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटला आहे. या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी रविवारी खा. शरद पवार यांनी मुंबईत इच्छुकांशी खलबते करत त्यांची मते जाणून घेतली. दरम्यान, लवकर निर्णय होणार असून जयकुमार गोरेंविरोधात कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे. बैठकीत इच्छुकांशी संवाद साधल्यानंतर … Read more

आर्थिक टंचाईमुळे ‘लाडकी बहीण’ योजना बंद; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केली टीका

Satara News 20241021 090425 0000

कराड प्रतिनिधी | महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे; परंतु निवडणूक आयोगाने सूचना केली म्हणून ही योजना बंद केल्याचे सत्ताधारी खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सातारा येथील काँग्रेस भवनामध्ये आ. चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद … Read more

शहीद जवान अमर पवार यांच्यावर बावडामध्ये आज अंत्यसंस्कार

Satara News 20241021 080036 0000

सातारा प्रतिनिधी | छत्तीसगड येथे नारायणपूर विभागातील नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत भूसुरुंगाचा स्फोट होऊन खंडाळ्यातील जवान अमर पवार हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव येण्यास उशीर झाल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता बावडा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खंडाळा तालुक्यातील बावडा येथील अमर पवार हे छत्तीसगड मधील नारायणपूर कॅम्पमध्ये असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यावेळी … Read more

जिल्ह्यात 66 हजार मतदार प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

Satara News 20241021 072811 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात मतदारांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे 65 हजार 893 मतदार वाढले आहेत. हे मतदार 20 नोव्हेंबरला प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नवमतदारांची संख्या सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात एकूण 29 लाख मतदार असून, त्यापैकी केवळ 60 ते 63 टक्के मतदान होत असते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने … Read more

कराड तालुक्यातील वराडेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

Karad News 20241020 224315 0000

कराड प्रतिनिधी | शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर ऊसातून आलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील वराडे येथे घडली. यावेळी शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ही घटना शनिवारी दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावच्या पश्चिमेस वारसुळे नावच्या शिवारात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे येथील शेतकरी दीपक शिवाजी साळुंखे शनिवारी १९ रोजी … Read more

मसूरसह हेळगावात चिकुनगुनियासदृश आजाराने ग्रामस्थ त्रस्त; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण

Karad News 4 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मसूर व हेळगावसह परिसरात चिकुन गुनियासदृश आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. सध्या अंग दुखणे, डोके दुखणे, हाडांचे सांधे दुखणे, पायांची बोटे व हातांची बोटे दुखणे, थंडीताप व तोंडाला कोरड पडणे आणि चालायलाही न येणे अशी परिस्थिती अनेक जणांची झाली आहे. चिकुनगुनिया व डेंग्यू सदृश रुग्ण परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येऊ … Read more

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पोलीस प्रशासनाकडून पाहणी

Karad News 3

कराड प्रतिनिधी । नुकतीच विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून प्रशासनाकडून निवडणूक प्रशिक्षणसह इतर कामे केली जात आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी नुकतीच करण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबी पोलीस प्रशासनाकडून तपासण्यात आल्या. यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, … Read more

पाचगणी फेस्टिव्हल यंदा 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार; जिल्हाधिकाऱ्यांकडे आराखडा सादर

Pachagni News

सातारा प्रतिनिधी । पाचगणी शहरातील प्रत्येक घटकाला एका छताखाली घेऊन भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी, पर्यटनाला चालना आणि गिरीस्थानांचा लौकिक वाढवण्यासाठी होणाऱ्या पाचगणी फेस्टिव्हलची धूम यंदा ता. २९ नोव्हेंबरपासून तीन दिवस सर्वांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील प्रस्ताव आणि स्मरणिका नुकतीच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सादर करण्यात आली. त्या वेळी श्री. डुडी यांनी या आयोजनाचे कौतुक करत, … Read more

कराडातील इंदोलीत आढळला 7 फूट लांबीचा इंडीयन रॉक पायथन

Karad News 1 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथे शनिवारी संध्याकाळी एक मोठा दुर्मीळ असा भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर संबंधित अजगरास पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, इंदोली, ता. कराड येथे वनपाल संदीप कुंभार … Read more

साताऱ्यात फटाके विक्रीच्या परवानगीवर निघाला तोडगा

Satara News 21

सातारा प्रतिनिधी । दिवाळी तोंडावर आली असताना फटाके विक्रीची परवानगी मिळत नसल्याने फटाके विक्रेते हतबल झाले होते. मात्र, गुरुवारी तहसीलदारांनी फटाके विक्रीचा परवाना देण्याचे मान्य केल्यानंतर फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साताऱ्यातील माची पेठेमध्ये काही दिवसांपूर्वी फटाक्यांच्या दारूचा भीषण स्फोट झाला होता. यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला होता. तर चौघे जण गंभीर जखमी … Read more

फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिहांची लागणार प्रतिष्ठा पणाला

phalatan News

सातारा प्रतिनिधी । फलटण विधानसभा मतदार संघात मात्र उमेदवारापेक्षा जास्त येथील दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची हि निवडणूक मानली जात आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Assembly Constituency) हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत … Read more

साताऱ्याच्या शाहूनगर, सदरबझारात पाण्याचा ठणठणाट

Satara News 19

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विसावा नाका येथील दोन दाबनलिका फुटल्याने शाहूनगर, सदरबझार, दौलतनगर, पिरवाडी आदी भागांत सात दिवसांपासून पाण्याचा ठणाठणाट सुरु आहे. दरम्यान, पाइप जोडण्याचे काम वेगाने सुरु असून उद्यापर्यंत हे काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे. शहरातील शाहूनगर, सदरबझार, दौलतनगर, पिरवाडी, जुना आरटीओ चौक परिसरात प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या भागासाठी पाणीपुरवठा … Read more