परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले; नुकसानीमुळे शेतकरी धास्तावला

Satara News

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक व्यावसायिकांचे साहित्य भिजल्याने नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दिवसभर पाऊस उघडीप देत असून, … Read more

मतदानाचा शंभर टक्के हक्क बजवावा – याशनी नागराजन

satara News 4 1

सातारा प्रतिनिधी । लाेकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. मतदारांनी मतदानाचा शंभर टक्के हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने फलटणचा विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम बाजार फलटण येथे मतदार जनजागृती मेळावा … Read more

मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा नवा उपक्रम; कराड उत्तरेत पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्रे उभारणार

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनातर्फे विविध मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून पिंक, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्रांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदान केंद्र क्रमांक २३९ उंब्रज हे केंद्र पिंक बुथ सखी असणार आहे. केंद्रावर सर्व मतदान अधिकारी स्थानिक मतदान कर्मचारी, पोलिस … Read more

जिल्ह्यात 34 हजार आजोबा अन् आजी करणार घरातून मतदान; 12 डी फॉर्म भरण्याची प्रक्रिया साताऱ्यात सुरू

Satara News 2 2

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची तयारी सुरू आहे.आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक सुरू असताना ज्येष्ठ मतदारांना घरातूनच मतदान (होम वोटिंग) करण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. यासाठी १२ डी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून ८५ पेक्षा जास्त वय असणारे ३४ हजार ८०० ज्येष्ठ नागरिक घरातून मतदान करू शकणार … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ पुरातन मंदिरात आढळले प्राचीन पटखेळांचे अवशेष

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । प्राचीन खेळ संवर्धन मोहीमअंतर्गत राज्यभर ऐतिहासिक प्राचीन पटखेळांच्या अवशेषांचा शोध व संवर्धनाचे कार्य सुरू असून, सातारा जिल्ह्यातही पटखेळांचे अवशेष शोधण्यात अभ्यासकांना यश आले आहे. नाशिकचे पुरात्वज्ञ सोज्वळ साळी व साताऱ्याच्या साक्षी महामुलकर या अभ्यासकांनी किकली (ता. वाई) येथील पुरातन भैरवनाथ मंदिरात प्राचीन पटखेळांचे संशोधन केले. किकलीतील भैरवनाथ मंदिर बारा ते चौादाव्या शतकातील … Read more

भाजपने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Karad News 7

कराड प्रतिनिधी । मोदी, शहा व अदानींनी नकळत मुंबई हातात घेतली आहे. गेल्या दहा वर्षात भाजपने महाराष्ट्राला छळले असून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला नेल्याने महाराष्ट्राचा विकास खुंटला. महाराष्ट्राचा सरकारी मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घातल्या. आम्ही आवाज उठवल्यानंतर मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढतो म्हणून सांगितले. ती श्वेतपत्रिका कुठाय? असा सवाल करत आमचे सरकार आल्यानंतर विकासकामांच्या बोगस टेंडरची चौकशी करणार … Read more

धैर्यशील कदम हेच कराड उत्तरचे खरे दावेदार – भिमराव पाटील

Karad News 20241022 102228 0000

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचेच चार उमेदवार आपापली दावेदारी सांगत आहेत. मात्र, धैर्यशील कदम यांनी मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत आणलेला कोट्यावधींचा निधी, त्यांचा दांडगा जनसंपर्क, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा, सक्षम मतगठ्ठा आणि मतदारसंघातील पोषक वातावरण पाहता तेच खरे कराड उत्तरचे दावेदार आहेत. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा मतदारसंघ भाजपला सोडून धैर्यशील … Read more

पोलिस असल्याचे सांगून लुटायचे; दोघांना अटक करताना एकाने घेतला पोलिस कर्मचाऱ्याला चावा

Vaduj News 20241022 084434 0000

सातारा प्रतिनिधी | पोलिस असल्याचे सांगून वृद्धांना लुटत संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या तोतया पोलिसांचा अखेर पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. मात्र, यावेळी चोरट्याशी झालेल्या झटापटीत चोरट्याने वाहतूक पोलिसाचा चावा घेतला. तरीही पोलिसांनी चोर ट्यांना पकडले. सिराज जाफर इराणी, मुस्लिम नासिर इराणी (दोघेही रा. लोणी काळभोर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची … Read more

हुतात्मा अमर पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara News 20241022 075340 0000

सातारा प्रतिनिधी | देशासाठी हौतात्म्य पत्करण्याच्या सातारा जिल्ह्याच्या शौर्यशाली परंपरेत बावडा (ता. खंडाळा) येथील हुतात्मा जवान अमर शामराव पवार यांच्या कारकिर्दीने आणखी एक नोंद झाली. काल सोमवारी उपस्थित जनसागराने दिलेल्या ‘अमर रहे, अमर रहे अमर पवार अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणांसह भारावलेल्या वातावरणात आणि शासकीय इतमामात बावडा (ता. खंडाळा) येथील … Read more

कारमधून 1 कोटी 40 लाखांची रक्कम लुटल्याचा बनाव, CID हवालदारासह कार चालकच निघाला आरोपी

1001007347

कराड प्रतिनिधी | कराडजवळ हवालाची तीन कोटींची रक्कम लुटल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती. त्याच्याशी साधर्म्य असणारी आणखी एक घटना पाचवड (ता. वाई) येथे महामार्गावर घडली. परंतु, रक्कम लुटीचा बनाव भुईंज पोलिसांनी अवघ्या तीन तासात उघडकीस आणला. कोल्हापुरातील व्यावसायिकाची १ कोटी ४० लाखांची रक्कम पुण्यातून कोल्हापूरला घेऊन जाताना सातारा जिल्ह्यातील पाचवड (ता. वाई) हद्दीत ती अज्ञातांनी … Read more

विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; भाजप, वंचितने केले उमेदवार जाहीर

Satara News 20241021 210854 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने मंगळवार (दि. 22) पासून सुरुवात होत आहे. गावोगावी प्रचाराचा धुरळा उडला आहे. आता मंगळवारपासून उमेदवांराना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी (दि. 24) गुरुपुष्यामृत योग असून, अनेकांनी या मुहूर्तावर आपले अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनानेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन … Read more

झटपट श्रीमंतीसाठी शेतात गांजा अन् अफूची झाडे; 9 महिन्यांत 53 लाखांचा माल हस्तगत

Crime News 1 1

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शहरी भागात पानटपरीच्या आडोशाला गांजाचे झुरके घेणाऱ्यांची संख्या पाहायला मिळत आहे. अशा व्यसनाधीन झालेल्या ३९ जणांवर पोलिसांकडून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरुणाईमधील वाढती व्यसनाधीनता समाजासाठी चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे झटपट श्रीमंतीसाठी काहीजण शेतात गांजा अन् अफूची देखील झाडे लावत असल्याने अशांवर देखील पोलिसांकडून वर्षभरात कारवाया … Read more