Crime News : भयाण शांततेत ‘तो’ पिस्तूल घेऊन आला अन् पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड शहरात एकीकडे चोऱ्या-लुटमारीच्या, पिस्तूल विक्रीच्या घटना वाढू लागल्या आहेत तर दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींची धरपकड कारवाई केली जात आहे. अशात रविवारी मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. तर सोमवारी रात्री लाच घेताना ACB च्या पथकाने एका नगरअभियंत्यासह एकास अटक केले. यानंतर पोलिसांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विनापरवाना देशी बनावटीचे … Read more

Karad News : मलकापूरच्या नगर अभियंत्यास ACB ने रंगेहाथ पकडले; 30 हजार रुपयांची घेतली लाच

jpg 20230710 223500 0000

कराड प्रतिनिधी | आपल्या स्वच्छतेमुळे नाव कमावलेल्या मलकापूर येथील अभियंत्यास आज लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली. यामध्ये नगर अभियंता गट क वर्गमधील शशिकांत सुधाकर पवार (वय 37, रा. मंद्रूळ कोळे, ता. पाटण जि. सातारा, सध्या रा. वसंत विला पाच मंदिर जवळ कोयना … Read more

Crime News : कराड येथे शिंदे डॉक्टरांच्या बंगल्यात 46 लाखांचा दरोडा; मध्यरात्री नक्की काय घडलं? CCTV पहा

Crime News

कराड प्रतिनिधी (Crime News) । मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री घरफोडी आणि दरोडा अशा घटना घडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री कराड शहरातील डॉक्टर शिंदे यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी तब्बल ४६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. आता या घटनेचे सीसीटिव्ह फुटेज समोर आले असून … Read more

कराडात मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरच्या घरावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत लुटले

jpg 20230710 104226 0000

कराड प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून कराड शहरात लूटमारीच्या घटना घडत आहेत. प्रत्येक महिन्यात किमान एक तरी घटना अज्ञातांनी गंठण लंपास केल्याची घटना घडतेच आहे. अशात आता कराड येथील सुप्रसिध्द अशा एका डॉक्टरच्या घरावर सात ते आठ अज्ञातांनी दरोडा टाकून सुमारे 25 तोळे सोन्या – चांदीचे दागिने व 15 लाख रुपये लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या … Read more

BRS जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवणार; शंकरराव गोडसे यांचं मोठं विधान

jpg 20230709 221642 0000

कराड प्रतिनिधी : तेलंगणाचे राज्य सरकारने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतीबाबत तेलंगणा पंजाबच्याही पुढे गेले आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही या पक्षाकडे आकर्षित होत असून आगामी काळात येणाऱ्या सातारा लोकसभेसह जिल्हय़ातील आठही विधानसभा मतदारसंघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका BRS (भारत राष्ट्र समिती) लढवणार आहे. बीआरएस हा कोणत्याही पक्षाची … Read more

पिता-पुत्र अन् मुलीनं अगोदर केलं जेवण, नंतर घेतला आयुर्वेदिक काढा; पुढं घडलं असं काही…

Phaltan Crime News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. फलटण शहरातील राहत असलेल्या पितापुत्राचा आकस्मित मृत्यू झाला आहे. दोघांनी जेवण केल्यानंतर आयुर्वेदिक काढा घेतला होता. दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही. हे कारण शव विच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर (वय 55, रा. … Read more

मोरणा नदीकाठच्या ग्रामस्थांनो सावध रहा…; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Morna River Dam News

कराड प्रतिनिधी । गेल्या चार ते पाच दिवसांत पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिणामी या तालुक्यातील मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मोरणा नदी काठावरील गावातील ग्रामस्थ, नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. मोरणा गुरेघर … Read more

काँग्रेसमधील आमदारांच्या फुटीच्या चर्चेबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान; म्हणाले की,

Prithviraj Chavan News 1

कराड प्रतिनिधी । काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील, याची अजिबात शक्यता नाही. मात्र, जाणीवपूर्वक भाजपकडून खोट्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नसल्याचे विधान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण … Read more

पावसाच्या संततधारेमुळे वेण्णालेक धरणाचा सांडवा लागला ओसंडून वाहू

Vennalek Dam News

सातारा प्रतिनिधी । गेल्या 8 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणीत पावसाची संततधार सुरु असून पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. गेल्या 24 तासात 138 मिली मीटर पावसाची नोंद असून काल शुक्रवारपासून वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महाबळेश्वर व … Read more

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई : 2 पिस्टलसह 5 जिवंत काडतुसे; 3 कोयता जप्त, तडीपार आरोपींना अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात व जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या ६ पथकांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवार नाका, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, वनवासवाडी एमआयडीसी या ठिकाणी छापा टाकला. तसेच तेथून 2 देशी बनावटीची पिस्टलसह … Read more

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.5 TMC ने वाढ; प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक पाण्याची आवक

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC ने वाढ झाली आहे. तसेच धरणात प्रतिसेकंद 30 हजार 266 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी 153, नवजामध्ये 124 आणि कोयनानगरमध्ये 98 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पाऊस आणि पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा … Read more

आदिवासी महिलेवर 11 जणांचा सामुहिक बलात्कार?सातार्‍यातील घटनेने महाराष्ट्रात खळबळ

20230707 221105 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना घडल्याचे उघड झाले आहे. कोळसा कारखान्यात काम करणाऱ्या एका कातकरी समाजातील आदिवासी महिलेवर तब्बल 11 जणांनी तिच्या पतीला खोपीत डांबून ठेवत सामूहिक अत्याचार केला असल्याचा आरोप स्वतः महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रफीक लतिफ शेख उर्फ बाळुशेख यास ताब्यात घेतले आहे. हि धक्कादायक घटनासुमारे 15 दिवसांपूर्वी … Read more