वानराला पकडताना बिबट्याचाही गेला जीव; नेमकी कुठे घडली घटना?

Satara Crime News 2

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर सध्या वाढला असून त्याच्याकडून अनेक वन्य प्राणी, पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, हल्ला करताना बिबट्याचा जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या देखील आहे. अशीच घटना सातारा तालुक्यात घडली आहे. वानराच्या पिल्लाचा शिकार करायला गेलेल्या बिबट्याला विजेचा धक्का लागल्यामुळे वानर आणि बिबट्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याची घटना सातारा … Read more

मुजावर टोळीतील पाच जण तडीपार; पोलीस अधीक्षक शेख यांची धडक कारवाई

Satara News 30

सातारा प्रतिनिधी । सातारा शहर परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे सराईतपणे गुन्हे करणाऱ्या अमीर मुजावर (वय २३, रा. पिरवाडी ता. सातारा) टोळी प्रमुखासह टोळीतील ४ जणांवर दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार सोमवारी संबंधितांवर कारवाई करण्यात आली. अमीर सलीम शेख (वय २३, रा. वनवासवाडी, कृष्णानगर ता.जि. सातारा), अभिजीत ऊर्फ … Read more

टेम्पो मागे घेताना झालेल्या अपघातात 3 वर्षाची चिमुकली ठार

Karad News 14

कराड प्रतिनिधी । टेम्पो पाठीमागे घेताना टेम्पोखाली सापडून अवघ्या तीन वर्षांची चिमुकली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कराडच्या कार्वे नाका येथे घडली. स्वरा नितीन शिंदे (वय ३) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलीस … Read more

ई-पॉस मशीनचा सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरण बंद, भाजप आमदाराच्या वडिलांवरच आली ‘ही’ वेळ, काय आहे नेमकी घटना?

Satara News 29

सातारा प्रतिनिधी । सर्व्हर डाऊनमुळे राज्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. दोन महिन्यांपासून उद्भवलेल्या समस्येवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळ रेशन धान्य वितरक संतप्त झाले आहेत. दुकानदारांनी ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत. राज्यातील रेशनवरील धान्य वितरण सर्व्हर डाऊनमुळं कोलमडलं आहे. यावरून रेशन दुकानदार आणि कार्डधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. माण तालुका स्वस्त … Read more

पारध्यांच्या दोन गटात वादावादी, गळ्यावर वार करून तरूणाचा खून, मुख्य संशयिताला अटक

Crime News 8

सातारा प्रतिनिधी | पारध्यांच्यादोन गटातील वादावादीत एका तरूणाचा खून झाला आहे. कोरेगाव तालुक्यातील भिवडी त्रिपुटी येथे रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्य संशयितास अटक करण्यात आली आहे. पारध्यांच्या दोन गटातील बाचाबाचीचे भांडणा रूपांतर होउन एका तरूणाच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. मयूर नागेश काळे (वय २२, रा. होलार वस्ती, … Read more

सातारा परिसरातील नागरीकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत आजपासून चार दिवस बदल

Satara News 20240806 085742 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील होमगार्ड अनुशेष नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून (६ ऑगस्ट) राबविण्यात येणार आहे. १० ऑगस्ट पर्यंत दरम्यान ही प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी सोनगाव (ता. सातारा) येथील हॉटेल शिवार ढाबा ते शेंद्रे या सार्वजनिक रस्त्यावर उमेदवारांची ८०० मीटर व १६०० मीटर धावणे आणि मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी सोनगाव ते शेंद्रे … Read more

कोयना धरणातील विसर्ग आणखी कमी होणार, तूर्तास पुराचा धोका टळला

Koyna Dam News 6

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही घटली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता विसर्ग आणखी कमी केला जाणार आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता कोयना धरणात ८६.११ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून ४०,००० क्युसेक्स आणि पायथा विद्युत गृहातून २१०० … Read more

महामार्गावरील खड्डे 15 ऑगस्टपर्यंत न बुजवल्यास गुन्हे दाखल करणार; पालकमंत्री देसाईंचा महामार्ग प्राधिकरणाला इशारा

Shambhuraj Desai News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या संदर्भात पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत. ते न बुजवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज … Read more

पावसाने दिली उघडीप; कोयना धरणातून 50 हजार वरून 40 हजार क्युसेक विसर्ग

Patan News 8

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणात सध्या ४५ हजार ६११ क्युसेक आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेला ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो आज दुपारी 12 वाजल्यानंतर ४० हजारवर करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होणार आहे. त्यामुळे नदीकाठी पुरापासून दिलासा मिळाला आहे. दुपारी सांडव्यावरील विसर्ग … Read more

निकृष्ट दर्जाच्या रस्त्या विरोधात संगमनगर धक्का येथे उद्या ‘रास्ता रोको’ आंदोलन

Patan News 7

पाटण प्रतिनिधी । गुहागर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रामुख्याने पाटण ते संगमनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या व्यक्तींचा बळी गेला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या वाहनधारकांसह प्रवाशांचे शारीरिक, आर्थिक नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या नागरिकांमधून केल्या जात आहेत. … Read more

धोम, बलकवडी धरणातून सोडलं पाणी; पुराच्या पाण्याचा वाईच्या महागणपतीला चरणस्पर्श

Wai News

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दुपारी धोम धरणातून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराच्या पाण्यामुळं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याने वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे तसेच नदीघाट लगतच्या … Read more

खोटा स्क्रीनशॉट पाठवून ‘त्यानं’ चक्क 30 लाखांचा नेला जेसीबी

Crime News 7

सातारा प्रतिनिधी | तीस लाखांचा जेसीबी खरेदी करत असल्याचे सांगून एनईएफटी स्क्रीनशॉट बनावट पाठवून जेसीबी पैसे न देताच नेण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत मोहन घोरपडे (रा.निमसाखर, ता. इंदापूर, जि.पुणे), सोहेल शौकत शेख (रा.अंथुर्णे, ता.इंदापूर, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माजीद फारूख शेख … Read more