पाटणमधील नवजातील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा झाला प्रवाहित

Ozarde Waterfall News

कराड प्रतिनिधी । उशिरा का होईना पावसाळा सुरुवात झाली असल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजून भरपूर पावसाची आवश्यकता आहे. पाऊस सुरु झाला की, काही दिवसात धबधबेही ओसंडून वाहू लागतात. अशाच एक पाटण तालुक्यातील कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. पावसाळ्यात कोयनानगर परिसरातील वातावरण बघण्यासारखे असते. … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना ठाकरे गटाचा धक्का !

jpg 20230625 164411 0000

कराड प्रतिनिधी । आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कराडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक व कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या कॉलेजमध्ये सदिच्छा भेट दिली. तसेच इंद्रजित गुजर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत कमराबंद चर्चा केल्यानंतर गुजर ठाकरे गटात लवकरच … Read more

एकनाथ शिंदे यांचे सैन्य भाडोत्री,BJP ला बाहेरुन घ्यावा लागतोय गद्दार मुख्यमंत्री; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut News

कराड प्रतिनिधी । रशियात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनी नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपाचे भाडोत्री सैन्य असून, हे सैन्य भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण शिंदे यांचे सैन्य भाडोत्री आहे. आणि भाजपलाही अशा बाहेरून गद्दार मुख्यमंत्र्यांना घ्यावं लागतंय, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

अगोदर मोबाईलवर ठेवला स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस; नंतर नवविवाहित तरुणानं केलं असं काही…

Suicide , Crime News

कराड प्रतिनिधी । दोन महिन्यापूर्वी लग्न झालं. खासगी वाहनचालकाची नोकरी करून स्वप्नील आपला संसार चालवत होता. बायको माहेरी गेल्यानंतर त्याने मोठा निर्णय घेतला. मोबाईलवर स्वतःच्या श्रद्धांजलीचा स्टेटस ठेऊन राहत्या घरात गळफास घेवून स्वप्नीलने आत्महत्या केली. पाटण तालुक्यातील करपेवाडी गावात घडलेल्या या खळबळ उडाली आहे. स्वप्नील उर्फ बंटी दिनेश करपे (वय 22), असे नवविवाहित तरुणाचे नाव … Read more

कराड शहरात पालिकेकडून पाणी कपात

Water Supply Karad Municipality

कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावणार हे नक्की या पार्श्वभूमीवर शहरात पाणीपुरवठा करताना तो कमी स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत … Read more

सातारा पोलिसांची पुन्हा वेशांतर करुन कारवाई; वारकरी बनून पालखीत गेले अन्…

Crime News 1 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे भाविकांनी दर्शन घेतले. पालखी सोहळा जिल्ह्यात आल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. पालखी सोहळ्यावेळी चोरीचे प्रकार होणार असल्याचे गृहीत धरत 7 वारकरी वेशातील पथके अंमलदारांसह लक्ष ठेऊन होते. संबंधित वारकरी वेशांतर करून वारीमध्ये बेशिस्तरीत्या वर्तन करताना … Read more

CM एकनाथ शिंदेंच्या गावालगत पूल कोसळला; 3 जण गंभीर जखमी

Eknath Shinde News

कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस झाले सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या गावालगत असलेल्या शिंदी ते आरवला या दोन गावांना जोडणारा पूल कोसळून अपघात झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. या अपघातात 3 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खेड येथे दाखल करण्यात आले. तसेच … Read more

कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद; जलाशयात फक्त ‘इतका’ टीएमसी साठा शिल्लक

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । राज्यात जूनचा महिना संपत आला तर अद्याप मॉन्सूनच्या पावसाचे आगमां झालेले नाही. पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरण, तलाव व विहिरींतील पाणी साठ्यावर झाला आहे. तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस … Read more

जिल्ह्यातील दुष्काळी प्रकल्पांसह म्हसवड-धुळदेव MIDC ला गती देणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Karad

कराड प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात जे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध केला जाईल. तसेच माण तालुक्यातील म्हसवड-धुळदेव औद्योगिक वसाहतीच्या कामालाही गती देण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कराड येथील कृष्णा सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत व जलसंपदा विभागाच्या … Read more

आता ऑलिंम्पिकवीर खाशाबांच्या गावातच मिळणार कुस्तीचे धडे ! क्रीडा संकुलाच्या नव्या प्रस्तावाबाबत क्रीडा मंत्र्यांची उद्या बैठक

Khashaba Jadhav

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव भारताचे पहिले आॅलिंम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील जन्मगावी क्रीडा संकुल उभारणीसाठी क्रीडा विभागाने ५ आॅक्टोबर २०१८ मध्ये जमीन ताब्यात घेतली. त्यापासून आजपर्यंत १४ वर्षात क्रिडा संकुल होणे अपेक्षित होते. मात्र, क्रिडा विभागास साधी संकुलाची संरक्षक भिंत देखील पूर्ण करता आलेली नाही. आता उद्या गुरुवारी क्रिडा मंत्रींच्या … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कराड मुक्कामी; BJP कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन

Devendra Fadnavis to stay in Karad

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत कराडला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता कराड येथे भव्य … Read more

लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Ananda Varkat Death Train Accident

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली. आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारीत ते ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू … Read more