काॅपर फाॅईल्स चोरीचा गुन्हा पोलिसांकडून 2 दिवसात उघड; 4 जणांना अटक

Shirwal Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रात्रीच्या वेळेस एका कंपनीतून तब्बल 10 लाख 58 हजार 400 रुपयांच्या किमतीच्या तांब्याच्या फाॅईल्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलिसांनी दोनच दिवसांत या घटनेतील आरोपींचा शोध घेवून चौघांना ताब्यात घेतले आहे. अविनाश दिपक मछले ऊर्फ कोकाटे … Read more

Kas Pathar Season 2023 : कास पठारावर रानफुलांच्या रंगोत्सवाला सुरुवात; कळ्या उमलू लागल्या

Kas Pathar Buds bloomed

सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ आणि विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर (Kas Pathar Season 2023) फुलांचा सडा बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावर सध्या विविध अशा आकर्षक रंगाच्या फुलांच्या कळ्या उमल्ल्या असून 10 ते 15 दिवसात या ठिकाणी फुलांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील कास, कोल्हापुरातील मसाई आणि सांगली जिल्ह्यातील … Read more

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दीड दिवसात गंभीर आजारांच्या 42 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Karad Dr. Paras Kotharis News jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील वेणूताई उपजिल्हा रुग्णालयात मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल चिकित्सा सर्जन डॉ. पारस कोठारी यांच्यासह त्यांच्या 8 जणांच्या टीमकडून हरनिया, जिभेवरील तसेच अंडाशयतील गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या 42 बालकांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेविकांच्यावतीने कराड व पाटण तालुक्यातून 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांच्यापैकी … Read more

लेह- लडाखमध्ये अपघातात सातारा जिल्ह्यातील जवान शहीद

Army Jawan Vaibhav Sampatrao Bhoite News jpg

सातारा प्रतिनिधी । लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून जात असताना अचानक खोल दरीत कोसळला. या अपघातात 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला तर 1 गंभीररित्या जखमी झाला. दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारी परिसरात झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील जवान वैभव संपतराव भोईटे (वय 30, राजाळे ता. फलटण) हेही शहीद झाले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे फलटण तालुका शोककळा … Read more

अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवणाऱ्या टोळीकडून कराडच्या दांपत्याचीही फसवणूक

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तळबीड परिसरातील एका दाम्पत्याला गंडा घालणाऱ्या या टोळीकडून कराड शहर परिसरातील आणखी एका दाम्पत्यालाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. विवाहित जोडप्यांची फसवणूक करणाऱ्या या टोळीला सहकार्य करणाऱ्या सातारा शहरातील बहिण – भाऊ असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इलियास राशिद शेख, रेश्मा राशिद शेख (दोन्ही रा. करंजे पेठ, सातारा) … Read more

कोयना धरणात 84. 17 TMC पाणीसाठा

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असून जिल्ह्यातील धरण, तलावामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. दरम्यान, दोन दिवसापासून कराडसह पाटण तालुक्यात पावसाच्या रिमझिम श्री कोसळू लागल्या आहेत. कोयना धरणात आठवडाभरात 3. 5 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची भर पडली असून असून धरणात सध्या 84. 17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात आज, रविवार, … Read more

पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद; गाड्यांचे मार्ग बदलले

Pune Satara Railway News jpg

कराड प्रतिनिधी । पुणे-सातारा रेल्वेमार्ग आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवत काही रेल्वेचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस रविवारी रद्द करण्यात आली असून पुणे – कोल्हापूर धावणारी पॅसेंजर रविवारी पुणे – सातारा मार्गे धावणार नसल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली … Read more

खंबाटकी बोगद्यातील वाहतूक 3 तासांनी पूर्ववत; खांब हटविल्यामुळे पर्यटकांसह प्रवाशांना दिलासा

Khambataki Tunnel News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर लोखंडी अँगल आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पीएस टोलरोड, राष्ट्रीय प्राधिकरण आणि पोलिसांनी 3 तासांत बोगद्यातील रस्त्यावरील खांब बाजूला केल्याने खंबाटकी बोगद्यातील वाहतूक पूर्ववत झाली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्यात कारवर पडलेल्या लोखंडी खांबामुळे वाहतूक रोखण्यात … Read more

स्मशानभूमीत सापळा रचून ‘त्यांनी’ रेकॉर्डवरील आरोपीस केली अटक; 70 हजाराच्या देशी पिस्टलसह 2 जिवंत काडतूसं जप्त

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कराड तालुक्यातील हजारमाची गावच्या हद्दीतील स्मशानभुमी परिसरातून रेकॉर्डवरील आरोपीस शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून 70 हजार 400 रूपये किंमतीचे देशी बनावटीचे 1 पिस्टल आणि 2 जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. अभिषेक संजय पाटोळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे या स्थानिक गुन्हे … Read more

पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरण भरण्यासाठी ‘इतक्या’ TMC ची गरज

Koyna Dam 1

कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक बंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगरमध्ये 24, नवजामध्ये 30 आणि महाबळेश्वरमध्ये 19 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणात 83.94 इतका समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, धरण भरण्यासाठी अजून 21 टीएमसी पाण्याची गरज आहे. वास्तविक कोयना धरणाची पाणी … Read more

दर रविवारी दिल्लीला जाणारी ‘ही’ रेल्वे आता सातारा, कराडला थांबणार; खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Express Train Srinivas Patil News jpg

कराड प्रतिनिधी । हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक रविवारी धावणार आहे. मात्र, या गाडीला सातारा व कराड येथे थांबा नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मिरज किंवा पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस सुरुवातीला मिरज पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. त्यानंतर मागणी ही गाडी सातारा, … Read more

वाटेगावला रविवारी पहिले शाहीर लोककला संमेलन : डॉ. भारत पाटणकर

First Shaheer Folk Art Festival in Wategaon Dr. Bharat Patankar jpg

कराड प्रतिनिधी । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अमर शेख यांचा वारसा पुढे नेण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव (ता.वाळवा) येथे दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी पहिले शाहिरी लोककला संमेलन आयोजित केलेले आहे. जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता उदघाटन होणार असून अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई श्रीमती सावित्रीबाई … Read more