सातारा जिल्ह्यातील ‘हे’ गाव बनलय राज्‍यातील पहिले फळांचे गाव

Dhumalwadi Village News 20230904 091233 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मधाचे गाव, पुस्तकाचे गाव अशी गावे आपण पाहिली आणि एकली असतील. मात्र, जिल्ह्यात आता असे गाव तयार झाले आहे की त्या ठिकाणी फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातेय. गावातच फळाचे उत्पादन, गावातच त्यावर प्रक्रिया केली जात आहे. ते गाव म्हणजे फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे होय. या ठिकाणी विविध १९ प्रकारची … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात स्मशानभूमीत कावळ्यांऐवजी वानरे शिवतात नैवेद्य

Monaky News 20230903 234656 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | एखादी व्यक्ती मृत्यू पावली की तिच्या तिसऱ्या, दहाव्याच्या कार्यक्रमास स्मशानभूमीत नैवेद्य ठेवला जातो. यावेळी त्या नैवेद्यास कावळा शिवला की त्या व्यक्तीस मुक्ती मिळाली, तिच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या अशी समजूत मानली जाते. मात्र, सातारा जिल्ह्यात एक असे गाव आहे की त्या गावात कावळे कमी आणि वानरेच जास्त आहेत. कावळ्या ऐवजी वानरेच … Read more

सातारा जिल्हा उद्या बंद; मराठा क्रांती मोर्चाने केले ‘हे’ आवाहन

Satara News 20230903 215007 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली आहे. सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर … Read more

ज्या किल्यांवर शिवकार्य करायचे तिथे आमची आपणास शेवटपर्यंत साथ राहील : खा. उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale News 20230903 212357 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री प्रतिष्ठाण हिंदुस्थान यांच्यासह अनेक शिवभक्तांच्या माध्यमातून व गोडवली ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्या सहकार्यातून उत्कृष्ठ असे तानाजी मालुसरे यांचे स्मारक आज त्यांच्या जन्मभूमीत उभे राहिले याचे मनापासून समाधान आहे. सह्याद्री प्रतिष्ठाण व तमाम शिवभक्तांच्या पाठीशी कायम ठामपणे आम्ही उभे आहोत संपूर्ण राज्यातील ज्या किल्यांवर व ऐतिहासिक ठिकाणी आपणास शिवकार्य करायचे तिथे आमची … Read more

कराडचा जनावरांचा आठवडी बाजार बंद?; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Animal News 20230903 202453 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या पशुपालक शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. कारण गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर या शेजारील जिल्हयात लंम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या रोगाच्या प्रादुर्भाव सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी असल्याचे आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी … Read more

…तर कास पठारासह महत्वाच्या पर्यटन ठिकाणाचे चलनही वाढेल : खा. उदयनराजे भोसले

Udayanaraje Bhosale 20230903 191844 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कास पठारावरून महाबळेश्वरकडे जाणारा जुना राजमार्ग खुला झाला तर महाबळेश्वर, पाचगणीतील पर्यटकदेखील कास पठाराला भेट देतील. पर्यटकांची संख्या वाढली तर आपसूकच या भागाचे चलन-वलनही वाढेल. पर्यटन वाढण्यास याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिपादन केले. जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला असून, हे … Read more

खा. उदयनराजेंसोबतच्या चर्चेनंतर पालकमंत्री देसाईंनी मराठा समाजबांधवांना केलं ‘हे’ आवाहन

Satara Shambhuraj Desai News 20230903 152131 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. काल सर्वत्र चक्काजाम आंदोलने करण्यात आली. या घटनेवरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार … Read more

साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कराड तालुक्यातील विशाल कांबिरे ठरला उपविजेता

Satara News 20230903 124237 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेत सुमारे साडे सहा हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत कराड तालुक्यातील मसूर येथील विशाल कांबीरे हा उपविजेता ठरला आहे. सातारा पोलीस ग्राउंड ते यवतेश्वर घाट आणि पुन्हा पोलीस ग्राउंड असा स्पर्धेचा मार्ग असून आज सकाळी खासदार उदयनराजे … Read more

हैद्राबाद, कर्जतमध्ये 33 लाखांच्या 3 ट्रकची विक्री करणाऱ्या आरोपीला वाई पोलिसांकडून अटक

Wai Crime News 20230902 190655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फसवणुक करुन परस्पररीतीने सुमारे 33 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 3 ट्रकची विक्री करणाऱ्या आरोपीला वाई पोलिसांनी अटक केली आहे. हैद्राबाद, कर्जत/ जामखेड, खुलताबाद (औरंगाबाद) येथुन आरोपीसह ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अब्दुल कादीर मोहम्मद अली सय्यद (वय 51) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई पोलीस … Read more

जखिणवाडीत 2 तासांच्या रेस्क्यू मोहिमेतून विहीरीत पडलेल्या 2 बिबट्याच्या बछड्यांची सुखरूप सुटका

Karad Lepard News 20230902 154902 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली. विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्याना वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर एका मागून एक अशा 2 बिबट्याच्या बछड्यांना पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

कराडात मराठा क्रांती मोर्चाकडून जालनातील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध

Karad News 20230902 151918 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद शनिवारी कराड येथे उमटले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी कराडच्या दत्त चौकात निषेध नोंदविण्यात आला. 15 सप्टेंबरपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत गृहमंत्र्यांनी … Read more