सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे 13 जनावरांचा मृत्यू; बाधितांचा आकडा झाला 202

20230906 094633 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून आता बाधित पशुधनाचा आकडा 202 इतका झाला आहे. तर आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने लम्पीने बळी गेलेल्या पशुधनाची संख्या 13 झाली आहे. जिल्ह्यात बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढलेली आहे. बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढत असून सोमवारी चर्मरोग झालेल्या … Read more

शिरवळ पोलीसांची कर्नाटकात धडक कारवाई ; 21 लाखाच्या चोरीतील गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

20230905 163144 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विंग, ता. खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे फ्रिज, वॉशिंग मशिन व कंटेनर असा 21 लाख 87 हजार 153 रुपयांचा मुद्देमाल लंपास करनाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या शिरवळ पोलीसांनी आवळल्या. याबाबत अधिक माहिती अशी की, विंग, ता. खंडाळा येथील आंतरराष्ट्रीय कंपनीचे 58 फ्रिज व 56 वॉशिंग मशिन किंमत 21 लाख 87 हजार 153 रुपयांचे साहित्य … Read more

‘मराठा क्रांती’च्या आंदोलकांचा पोलिसांनी महामार्गवरच अडवला मोर्चा; पुढं घडलं असं काही…

Satara Maratha Kranti Morcha 20230905 133807 0000 1 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथे मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वाई येथून साताऱ्याकडे पायी निघालेला मराठा समाजाच्या बांधवांचा मोर्चा पाचवड,ता. वाई येथील महामार्गावर पोलिसांनी अडवला. यावेळी आंदोलक व पोलिसांच्यात शाब्दिक वादावादी झाली. मात्र, काही वेळेनंतर तणाव मावळला. जालना येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज वाई ते सातारा, असा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पायी मोर्चाचे आयोजन करण्यात … Read more

खून करून 7 महिन्यांपासून होता फरार; अखेर ठोकल्या बेड्या

20230905 112229 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे – कोल्हापूर महामार्गाच्या हद्दीत वाढे फाटा नजिक सर्व्हिसरोड लगत सातारा येथील एकावर गोळीबार करत त्याचा खून केल्याची घटना ७ महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेतील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर अन्य २ आरोपी फरारी होते. त्यातील एकास अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

कराडात गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई; 1 किलो गांजा केला जप्त

Karad Crime News 20230905 104525 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री केली जात आहे. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास माहिती प्राप्त झाल्यानंतर या पथकाने कराड शहरातील कृष्णा नाका येथे गांजाची विक्री करण्यास आलेल्या एका सराईत गुन्हेगारास सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे 60 हजार रूपये किमतीचा 1 किलो … Read more

शिरवळच्या AK गँगच्या टोळीप्रमुखासह चौघांना मोक्का

Shirval News 20230905 094727 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाला तालुक्यातील शिरवळ येथील AK गँगमधील चौघांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई शिरवळ पोलिस ठाण्याच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. टोळी प्रमुख आतीष ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, (वय २१, रा. बौध्दवस्ती शिरवळ ता. … Read more

शिक्षण विभागात सातारा जिल्हा परिषद शाळेच्या 11 शिक्षकांचा डंका; “आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

Satara ZP

कराड प्रतिनिधी | भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना पुरस्कारांनी गौरवण्यात येते. यावर्षी प्रत्येक तालुक्‍यातून एक अशा 11 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more

मराठा क्रांती मोर्चाच्या चक्काजाममध्ये फलटणकर बांधवांचं ठरलं ! मतदानाबाबत घेतला मोठा निर्णय

Phalatan News 20230904 205330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अंतरवाली सराटी, ता. अंबड जि. जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज सातारा जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला. याला फलटण येथेही मोठा प्रतिसाद मिळाला. येथील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे तब्बल 2 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटणकरांनीही शंभर टक्के दुकाने बंद ठेवत … Read more

मराठा आंदोलकांना पाठींबा देत सातारा बार असोसिएशने घेतला ‘हा ‘ मोठा निर्णय

Satara Advocate News 20230904 195726 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांवर झालेला अमानुष लाठीहल्ला, मराठा आरक्षण या विषयावर राज्यभर चाललेल्या मराठा आंदोलनाला सातारा जिल्हा बार असोसिएशनने पाठींबा दिला आहे. तसेच यावेळी झालेल्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील खटले विनामोबदला चालवण्याचा मोठा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. जालना येथील घटनेनंतर सातारा वकील संघटनेच्यावतीने नुकतीच तातडीची बैठक घेण्यात आली. या … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा अवतरला ‘एक मराठा, लाख मराठा’; मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Maratha Kranti Morcha News 20230904 144823 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जालना येथील आंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली. मराठा क्रांतीच्या हाकेला संपूर्ण जिल्हा धावून गेला. जिल्ह्यात सातारा, कराड, पाटणसह फलटण येथील विविध व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत पाठींबा दिला. या आजच्या बंदमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक … Read more

जखिनवाडीत विहिरीत पडलेल्या ‘त्या’ 2 बिबट्याच्या बछड्यांची वन विभागाने घडवली आईसोबत पुनर्भेट…

Karad News 20230904 121322 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या 2 बछड्याची सुखरूप सुटका केल्यानंतर त्यांची आईसोबत पुनर्भेट घडविण्यात वनविभागास यश आले आहे. वनविभागाकडून रविवारी मध्यरात्री 1 वाजता रेस्क्यू ऑपरेशन राबविलेल्या मोहिमेचे दृश्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे पडल्याची घटना … Read more

1 वर्षांपूर्वी चोरीस गेलेले मोबाईलचा कराड पोलिसांकडून छडा; मालकांकडे केले सुपूर्द

Karad Mobail News 20230904 104243 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील शहर पोलिसांना गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यात यश आले आहे. सुमारे वर्षभरापूर्वी जे मोबाईल गहाळ झाले होते तसेच चोरीस गेले होते. त्या मोबाईलचा सायबर पोलिसांच्या मदतीने कराड पोलिसांनी छडा लावला आहे. काही मोबाईल पोलिसांनी शोधून काढत ते मुळ मालकांना कागदपत्रांसह परत केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी … Read more