गणेश भक्तांवर वाहतूक कोंडीचे ‘विघ्न’; कात्रजसह खंबाटकी घाटात 3 तासांपासून ट्रॅफिक जाम

Satata Khabataki Ghat News 20230916 124338 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विकेंड तसेच शनिवार – रविवारी दोन्ही दिवशी लागून आलेल्या सुट्टीमुळे व गणेशोत्सवामुळे गणेशभक्त तसेच चाकरमानी मोठ्या संख्येने पुणे-मुंबईहून गावी निघाले आहेत. मात्र, कात्रज घाट, खंबाटकी घाट या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सध्या खंबाटकी आणि कात्रज घाटात 3 तासांपासून मोठी वाहतूक … Read more

‘कराड दक्षिण’ मध्ये काँग्रेसची उद्यापासून निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा

Karad Congress News 20230915 204302 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा निघाली आहे. उद्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात होत आहे. “यात्रा संवादाची, … Read more

दंगलीनंतर पुसेसावळीतील जनजीवन पूर्वपदावर; मात्र, मोठा पोलिस बंदोबस्त

Pusesavali News 20230915 131429 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टवरून झालेल्या दंगलीनंतर विस्कळित झालेले पुसेसावळी येथील जनजीवन प्रशासनाच्या प्रयत्नानंतर काल गुरुवारपासून पूर्वपदावर येऊ लागले आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने काहीअंशी तणाव दूर होण्याबरोबरच आर्थिक उलाढाल सुरू झाली. गणेशोत्सवास अवघे चार दिवस उरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी येथील गणेशमूर्ती व्यावसायिकांनी आपले स्टॉल तसेच गणपती सजावटीच्या साहित्याची … Read more

फलटण एसटी आगाराच्या स्थानक प्रमुखाचे तडकाफडकी निलंबन; कारण वाचून बसेल धक्का

Phaltan News 20230915 120852 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण आगाराच्या वतीने महिलांसाठी अष्टविनायक दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित करण्यात आलेल्या अष्टविनायक दर्शनच्या 4 बसचे भाड्याचे पैसे जमा न करता स्वतःकडेच ठेवल्याचे निदर्शनास आल्याने फलटण स्थानक प्रमुख तथा सहायक वाहतूक अधीक्षक राजेंद्र वाडेकर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती फलटण आगार व्यवस्थापक वासंती जगदाळे यांनी दिली आहे. फलटण … Read more

कराडात पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत हिंदू- मुस्लिम समाज बांधवांचा मोठा निर्णय

Karad Police News 20230915 091608 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या राड्यानंतर हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाज बांधवामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही समाज बांधवांनी कराडात एकत्रित येत शांतता राखण्याचा निर्णय घेतला. आम्ही हिंदू- मुस्लिम समाज शांतताप्रिय असून कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. तसेच कराड शहरात तसेच कोणत्याही ठिकाणी मोर्चा काढणार नसल्याचे हिंदू व मुस्लिम समाजातील … Read more

महाबळेश्वरातील अनाधिकृत बांधकाम, उत्खननाबाबत जिल्हाधिकारी डुड्डींनी दिले ‘हे’ आदेश

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात होणारे अनाधिकृत बांधकाम, उत्खननावर सक्त कारवाई करणेत येईल. तसेच विनापरवाना वाणिज्य वापर होत असलेल्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तरी महाबळेश्वर तालुक्यामध्ये करण्यात येणारे बांधकाम व उत्खनन हे सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेवून करण्यात यावे. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम व अनधिकृत उत्खनन होणार नाही, याची दक्षता स्थानिकांनी घ्यावी, … Read more

सातारा जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताच्या ‘या’ दोन योजनांना मिळाली मंजुरी

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषद सेस अंतर्गत जिल्हयातील शेतऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येत आहेत. दरम्यान, जनावरांच्या चाऱ्याचा कार्यक्षम वापरासाठी शेतकऱ्यांना मुरघास साठवणूकीसाठी सायलेज बॅग तसेच कडबाकुटी यंत्र या दोन योजनांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या … Read more

आता ‘या’ समाजाने आरक्षण मागणीसाठी पंढरपूर-सातारा रस्त्यावर केला ‘रास्ता रोको’

Satara Pandharpur Road Protes News 20230914 145644 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अगोदरच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलनातून मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना आता धनगर समाजाने देखील धनगर आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी पंढरपूर जिल्ह्यातील माळशिरस येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदाेलनामुळे पुणे, सातारा, पंढरपूर आणि अकलूज रस्त्यावरील वाहतूक २ तासाहून अधिक काळ ठप्प झाली हाेती. धनगर आरक्षणसाठी … Read more

सोशल मीडिया वापरर्ते अन् Whatsapp ग्रुप ऍडमिनना सातारा पोलिसांनी दिला ‘हा’ इशारा

Satara Police News 20230914 142520 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात दंगल उसळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गेली तीन दिवस बंद करण्यात आली होती. इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी पोलिसांकडून सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हा व त्यातील सर्व तालुका पोलीस … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर शिरवळहद्दीत टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू

20230914 104146 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ हद्दीतील धनगरवाडी गाव परिसरात एका आयशर टेम्पोने मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशीरा हा अपघात झाला आहे. या अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर ट्रकचा (क्रमांक KA53C8343) … Read more

72 तासांनी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू; पुसेसावळी घटनेतील ‘त्या’ 16 जणांना पोलीस कोठडी

Satara Intarnet News 20230914 094604 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. ती आज सकाळपासून सुरू केली आहे. सोशल मीडियाचा कोणत्याही स्वरुपाच्या अफवा पसरू नये यासाठी 72 तास इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे लाखो रुपयांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच कामे ठप्प झाली होती. तर घटनेतील 16 … Read more

पुसेसावळी दंगलीनंतर साताऱ्यात शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Satara Shivendraraje Bhosale News 20230913 122856 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटांत झालेल्या राड्यात दंगलीत एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिध्दी पत्रक काढून प्रतिक्रिया दिली आहे. “सातारा जिल्ह्यात अतिशय अशोभनीय व निंदनीय घटना घडली आहे. सातारकरांसाठी सध्या कसोटीचा काळ असून, या कठीण प्रसंगात डगमगून न जाता सामाजिक सलोखा … Read more