नरेंद्र मोदी हे जनसामान्यांची काळजी घेणारे पंतप्रधान : डॉ. अतुल भोसले

Atul Bhosale News 20230922 181203 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. अगदी परवाच त्यांनी या देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक काम केले. पंतप्रधान मोदीजी हे सर्वार्थाने जनसामान्यांची काळजी घेणारे पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. … Read more

Satara News : सिंचनासाठी पुन्हा कोयनेतून सांगलीला सोडले पाणी; धरणातून ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी फारच कमी प्रमाणात पाऊस झाला असल्याने बळीराजा चिंतातूर आहे. पावसाअभावी यंदा कोयना भरले नसलेतरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर धरणात सध्या ९१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे … Read more

शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत शिक्षण आयुक्तांचे मोठे विधान; म्हणाले की,

Satara Education News 20230922 153548 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा सुरू आहे. संपूर्ण शैक्षणिक धोरण बदलणे ही फार मोठी प्रक्रिया असून या प्रक्रियेला विविध पातळ्यांवरून हिरवा कंदील मिळून त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अजून किमान दोन वर्षे लागतील असे महत्वाचे विधान शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले. सातारा … Read more

साताऱ्याच्या राजपथावर कर्मवीर भाऊराव पाटलांची ‘शेवरले’ धावली भुर्रर्

Satara News 20230922 140033 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आज साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कर्मवीर भाऊराव पाटलांची ‘शेवरले’ गाडी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली. यावेळी साताऱ्याच्या राज पथावरून कर्मवीरांची शेवरले धावली. आज कर्मवीर जयंती निमित्त रयत शिक्षण संस्थेेत कर्मवीर समाधीस विविध मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर कर्मवीर यांच्या तैलचित्र असलेल्या रथाची मिरवणूक प्रभात … Read more

दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिकेचा मृत्यू

Accident News 20230922 112410 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विसापूर (ता. खटाव) येथे दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिका संगीता अंकुश शिंदे (वय ४८, गादेवाडी) यांचा संगीता शिंद मृत्यू झाला. खटाव तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष अंकुश गणपत शिंदे यांच्या त्या पत्नी होत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिंदे गुरुवार (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुसेगाववरून मूळ गाव असणाऱ्या गादेवाडीकडे निघाल्या होत्या. दरम्यान औंध-फलटण राज्य … Read more

कराड तालुक्यातील 32 शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

Karad News 20230922 093931 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने कराड तालुक्यातील 32 शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार तसेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचेही वितरण करण्यात आले. कराड पंचायत समितीच्या बचत भवन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण … Read more

सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांत 81 टक्के पाणीसाठा; पहा कोणतं धरण किती भरलं?

Satara Dam News 20230921 233902 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील पाऊस गायब झाल्याने प्रमुख धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. सप्टेंबर महिन्यात धरण भरून पाणी सोडले, मात्र अजूनही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. सिंचनासाठी धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी या प्रमुख धरणांतून २२५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. … Read more

अबब…पुण्यातील 10 व्यावसायिकांनी माणच्या उद्योजकाला घातला 15 कोटींचा गंडा!

Fraud News 20230921 200143 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एखादा व्यवसाय करताना कुणी आपली फसवणूक करू नये याची प्रत्येक व्यावसायिक काळजी घेत असतो. कारण एखादा व्यवसाय किंवा धंदा म्हंटल की फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. अशीच आयात- निर्यातचा व्यवसाय करणाऱ्या माण तालुक्यातील एका उद्योजकाची पुण्यातील एका व्यावसायिकासह दहा जणांनी तब्बल 15 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुण्यातील 10 … Read more

सराईत गुन्हेगार सातारा जिल्हयातून हद्दपार!; शिरवळ पोलीसांची कारवाई

Shirval Crime News 20230918 103108 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असलेल्या 26 वर्षीय युवकाला शिरवळ पोलीस ठाणे कडुन पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करून उपविभागीय अधिकारी वाई यांनी सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील भोर व पुरंधर या 2 तालुक्यातुन 2 वर्ष कालावधी करीता हद्दपार केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक सातारा समीर … Read more

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी ‘त्यानं’ कट रचून संपवलं तिच्या पतीला; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20230921 185903 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्या च्या साथीदारासह तिच्या पतीचा गळा आवळून खून करुन मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधून निरा उजवा कालवामध्ये टाकल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे फलटण तालुका हादरून गेला आहे. याप्रकरणी फलटण पोलिसांनी शिताफीने तपास करुन मृताच्या पत्नीस अन् तिच्या प्रियकराला अटक केली. अद्याप एकजण फरार आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

400 कोटींच्या विकास आराखड्यातून पोलीस दलाला यावर्षी 12 कोटी रुपये देणार : मंत्री शंभूराज देसाई

20230921 163525 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | चांगल्या दर्जाची साधनसामग्री आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत पोलीस दलही गतिमान सेवा देऊ शकत नाही. यासाठी वित्त व गृह या दोन्ही खात्यांचा राज्यमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील तीन टक्के रक्कम पोलीस दलाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्याचा विकास आराखडा सुमारे 400 कोटींचा असून यामधून पोलीस दलाला यावर्षी 12 … Read more

सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; कराड तालुक्यातील शेतकऱ्यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा अन् प्रशासनास निवेदन

Karad Farmar News 20230921 154436 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून सरकार व जिल्हा प्रशासनाने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाय योजना युद्ध पातळीवर राबवाव्यात,अशी मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी शिवाजी पाटील, विश्वास … Read more