CRIME NEWS : व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह 4 जणांना अटक

Karad Bhel Fish News 20230926 105910 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह 3 जणांवर वन विभागाकडुन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत 6 कोटी रुपये इतकी आहे. महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील, … Read more

फलटणमध्ये कोयत्याचा धाक दाखवून मागितली खंडणी; पोलिसांनी आरोपीला 4 तासात ठोकल्या बेड्या

Phalatan Crime News 20230910 114750 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील एका व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेपाच सुमारास घडली होती. या घटनेनंतर अवघ्या चार तासात चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास १३५ रविवारपेठ उघडया मारुती मंदीरासमोर फलटण … Read more

कराडातील देखाव्यांना रात्री 12 पर्यंत परवानगी; कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेपुढे पोलीस नरमले…

Karad News 20230925 225815 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव कालावधीत रात्री दहापर्यंत ध्वनीक्षेपकाचा नियम काटेकोरपणे पाळला जातो. वर्षभर या नियमाला हरताळ फासला जातो. गणेश मंडळे सामाजिक देखावे सादर करू शकत नाहीत. त्यामुळे देखाव्यांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी कराडमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत मंडळांची ही मागणी अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी … Read more

वडुज तहसीलमधील एका विभागाची कुलूपाची हरवली चावी; पुढं घडलं असं काही…

Vaduj Tasil Office News 20230925 223417 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयात आज एक अनोखा प्रकार घडला. येथील एका विभागाचा कारभार आज चावी हरवल्याने कुलूपबंद राहिला. दुपारी १२:३० वाजेपर्यंत चावीच सापडली नसल्यामुळे नागरिकांचा कामांचा खोळंबा झाल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनीच हे कुलूप तोडले आणि त्यानंतर कामकाज सुरू झाले. आज आठवड्याचा पहिला दिवस तसेच गेली 2 दिवस कार्यालयाला सुटी असल्याने … Read more

विहीरीतील इलेक्ट्रीक मोटर चोरणाऱ्या 5 जणांची टोळी तडीपार

Crime News 20230925 192301 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील सातारा व कराड तालुक्यातील उंब्रज, तळबीड, बोरगांव पोलीस ठाणेहद्दीत विहीरीमधील इलेक्ट्रीक मोटर चोरीचे गुन्हे कारणाऱ्या टोळीतील ५ जणांवर तडीपारीची कारवाई सातारा पोलिसांकडून करण्यात आली आहे. १) गणेश बाळासाहेब कांबळे, (वय २९, रा. पेरले ताकराड जि सातारा) (टोळी प्रमुख) २) गणेश महेंद्र चव्हाण, (वय २०, रा. पेरले ता. कराड (टोळी सदस्य), … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा कौतुकास्पद निर्णय, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद-ए-मिलाद’ची मिरवणूक

Vagheri News 20230925 183618 0000 jpg

कराड प्रतिनिधी | यंदा गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) एकाच दिवशी आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे वाघेरी, ता. कराड) येथील मुस्लिम बांधवांनी देखील सलोख्याचे दर्शन घडवत शुक्रवारी, दि. २९ मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आणि ईद सणानिमित्त कराड ग्रामीण … Read more

कुठे गणरायाला वंदन तर कुठे मतदार संघातील भूमिपूजन; खासदार पुत्र सारंग पाटील यांची जनतेशी नाळ कायम

Sarang Patil News 20230925 171901 0000 jpg

कराड प्रतिनिधी | साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील हे आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे सर्वपरिचित आहेत. अधिकाऱ्यापासून ते लोकप्रतिनिधी होऊनही त्यांनी ग्रामीण भागाशी आपली नाळ सुरुवातीपासून आतापर्यंत टिकून ठेवली आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांनी देखील सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळत आहे. गणेशोत्सवानिम्मित त्यांच्याकडून मतदार संघातील गावागावात जाऊन गणरायाला वंदन करत विकास कामांची भूमिपूजन केली जात … Read more

सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’च्या प्रादुर्भाव; ‘इतक्या’ जनावरांच्या झाला मृत्यू

20230916 212330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला असून लम्पी स्कीनने आतापर्यंत ३० जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खिल्लार गाई १२, संकरित गाय १० व देशी ८ गाईचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात वाढत असलेल्या लम्पी स्कीनबाबत जनावरांची तपासणी मोहीम … Read more

इज्राईच्या शास्त्रज्ञांची कास पठारास भेट; सौंदर्य पाहून झाले मंत्रमुग्ध

Kas News 20230925 081256 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विख्यात इज्राईली वनस्पतिशात्रज्ञ, वैज्ञानिक आणि सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. मिखाल याकीर यांनी सुप्रसिद्ध अशा कास पुष्प पठारास नुकतीच सदिच्छा भेट दिली. येथील विविधरंगी पुष्पांचे सौन्दर्य, प्रसन्न, शुद्ध तसेच आल्हाददायक वातावरण अनुभवून ते मंत्रमुग्ध झाले. कास पठारावरील निसर्गाच्या सान्निध्यामुळे आपणास अत्युच्च कोटीचे आणि आश्चर्यकारक असे भावनिक समाधान मिळाले. तसेच या परिसरास केवळ अभ्यासासाठीच नव्हे … Read more

Crime News: फलटण खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

Phaltan Crime News 20230924 233519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | फलटण शहर पोलीस स्टेशन येथे सुमारे 6 दिवसापुर्वी खुनाच्या गुन्ह्याची घटना घडली होती. या घटनेतील फरारी आरोपीस असलेल्या दुसऱ्या आरोपीस फलटण ग्रामीण पोलीसांनी शिताफीने पकडले. राहूल उत्तम इंगोले रा. लोहगाव पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हदीमध्ये दिनांक १९/०९/२०२३ रोजी विडणी ता. … Read more

कराडातील ऐतिहासिक मनोऱ्यास DYSP अमोल ठाकूर यांनी दिली भेट; केली ‘या’ उपक्रमास सुरुवात

Karad DYSP Amoll Thakur News 20230924 231031 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरात अनेक एतिहासिक वस्तू आहेत. त्यामध्ये सर्वाधिक एतिहासिकपैकी जामा मशीद येथील मनोरे होय. या मनोऱ्यास आज कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः मनोऱ्यामध्ये सर्वात वरच्या मजल्यापर्यंत जाऊन पाहणी केली. तसेच एतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा व त्याच्या डागडुजी संदर्भात माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे ठाकूर … Read more

सातारच्या किल्ले अजिंक्यतारावरून कोसळला दगड; दरीमुळे टळली मोठी दुर्घटना

Satara Ajinkytara Fort News 20230924 202625 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर अनेक महाकाय दगड धोकादायक स्थितीत उभे आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, हे दगड वसाहतींच्या दिशेने कोसळण्याचा धोका निर्माण होतो. दरम्यान, रविवारी दुपारी एक भला मोठा दगड किल्ल्यावरून वसाहतींच्या दिशेने कोसळला. उंचावरून आलेल्या या दगडाचा वेग जास्त असल्याने डोंगर उतारावरील 2 झाडे उन्मळून पडली. हा … Read more