4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षाच्या तरूणाचा कोयना नदीपात्रात आढळला मृतदेह

Patan Crime News (1)

पाटण प्रतिनिधी । घरातील कोणास काहीच न सांगता अचानक घरातून चार दिवसांपूर्वी निघून गेलेल्या पाटण तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आज कोयना नदीपात्रात आढळून आला. रूपेश मनोहर चव्हाण (वय ३०, बनपेठ, येराड, ता. पाटण) असे तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बनपेठ – येराड, ता. पाटण … Read more

कराड पालिकेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा खंदारेचं!

Karad Shankar Khandare News jpg

कराड प्रतिनिधी । कराड पालिकेला मुख्याधिकारी काही टिकेना अशी गेल्या काही महिन्यापासून परिस्थिती पहायला मिळत आहे. एखादा अधिकारी आला कि तो वर्ष, दोन वर्षात पुन्हा बदली होऊन जातो किव्हा त्याच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. सध्या कराडचा कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर शहरातील अनेक प्रश्न, समस्यांचा भर … Read more

कराडला 30 टन निर्माल्य गोळा अन् 3 तासात कृष्णा नदीकाठ चकाचक!

Karad KrushnaGhat News jpg

कराड प्रतिनिधी । स्वच्छतेमध्ये देशात नाव काढलेल्या कराड पालिकेकडून गणेशोत्सवात देखील आपले काम चांगल्या रीतीने पार पाडले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने कृष्णा नदीत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. याचसोबत निर्माल्यही सोडले जाते. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करत काल दिवसभरात तब्बल 30 टन इतके निर्माल्य संकलित केले. तसेच त्यानंतर दुसऱ्या दिवशी … Read more

पाटील असल्याचे सांगत ‘त्यानं’ वृद्ध महिलेची 50 हजाराची मोहनमाळ केली लंपास…

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका भाजी मंडई येथे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी एक घटना घडली. “मी पाटील, ओळखलं का आजी?, मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे,” असे सांगत वृद्धेच्या गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किंमतीची मोहनमाळ अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेनंतर चक्रावलेल्या आजींनी थेट पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली. याप्रकरणी सातारा शहर … Read more

पुढील वर्षातील संभाव्य टंचाई रोखण्यासाठी आत्तापासूनच उपाय योजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । पुढील वर्षातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा, पाटबंधारेच्या प्रकल्पांची दुरुस्ती करावी. तसेच पाणी, चारा टंचाई संदर्भातील सर्व बाबींचा आराखडा तयार करुन आत्तापासूनच उपाययोजना सुरु करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आज पाणी, चारा टंचाईबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी डुडी … Read more

गणपती विसर्जनासाठी गेलेला महाविद्यालयीन युवक कृष्णा नदीत बुडाला; शोधकार्य सुरु

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी । नदी तसेच तलाव, विहिरींमध्ये गणपती विसर्जनासाठी जाताना काळजी घेण्याचा सल्ला घरच्यांकडून मुलांना दिला जातो. मात्र, त्याचे काहीवेळेला पालन न केल्यास अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना कराड तालुक्यातील खराडे गावात गृवर सायंकाळी घडली. येथील महाविद्यालयीन युवक गणेश संतोष जाधव (वय 19, रा. खराडे, ता. कराड) हा युवक बुडाला. यानंतर ग्रामस्थांची … Read more

साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत चेंगराचेंगरी; तरुण पायाखाली चिरडला; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात काल गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत डीजे आणि ढोल ताशांच्या ठेक्यावर तरुणाई नाचली. मात्र, रात्री विसर्जन मिरवणुकीत उसळलेल्या मोठ्या प्रमाणात गर्दीत प्रचंड चेंगराचेंगरी झाल्याने एक तरुण गुदमरून बेशुद्ध पडल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून त्या तरुणाला गर्दीतून सुरक्षित … Read more

सातारा नगरपालिकेकडून ‘उपयोगकर्ता शुल्का’ची आकारणी; नागरिकांमध्ये संताप

Satara News 20230915 094829 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरातील रहिवाशांकडून अनेक प्रकरणी कर आकारणी केली जाते. त्यामध्ये स्वच्छता, पाणीपट्टी, घरपट्टी आदी कराच्या माध्यमातून आकारणी करून त्यांना सुविधादी दिली जाते. मात्र, आता पालिकेकडून एक नव्या कराच्या आकारणीस सुरुवात करण्यात आल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०२३-२४ च्या करदेयक वितणामध्ये पालिकेने ‘उपयोगकर्ता शुल्क’ म्हणून नवीन कर आकारणी केली असून यामुळे … Read more

तुर्कीतून बाजरीचे बियाणे आणून काढले 3 फुट लांबीचे कणीस…; ‘माण’च्या शेतकऱ्यानं करून दाखवलं!

Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । पावसाअभावी पिकांना पाणी देणंही मुश्किलीचे बनले असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, दुसरीकडे कायम पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एका शेतकऱ्याने कमाल करून दाखवली आहे. माण तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणाची आणून त्याची लागवड केली असून या पिकाला ३ फुटांपर्यत कणसे लागली आहेत. माण तालुका … Read more

ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून स्वाभिमानी आक्रमक; ‘या’ तारखेपर्यंत कारखान्यांना आंदोलनाचा दिला थेट इशारा

Swabhimani News 20230928 100357 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सद्या साखरेचे भाव चांगले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव देखील मिळणार आहे. अशात दसरा-दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा तसेच २ ऑक्टोंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. तसे न केल्यास त्यानंतर आंदोलन करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने … Read more

‘राज्य उत्पादन शुल्क’ची दारु वाहतूकीवर धडक कारवाई; 22 लाख 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

Crime News jpg

कराड प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सातारा जिल्ह्यात तीन ठिकाणी धडक कारवाई करत गोवा बनावटीची अवैध्यरिती दारू ताब्यात घेतली. यावेळी कराड, पाटण व खंडाळा या तालुक्यात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 980 लिटर हातभट्टी दारु, 25 बॉक्स गोवा बनावट दारु, दोन चाकी वाहने, एक सहाचाकी वाहने असा सुमारे 2 लाख 56 हजार किंमतीचा मुद्देमाल … Read more

DYSP अमोल ठाकूर यांच्याकडून कराडच्या विसर्जनस्थळाची पाहणी; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

Karad DYSP Amoll Thakur News jpg

कराड प्रतिनिधी । लाडक्या गणपती बाप्पाचे उद्या गुरुवारी अनंत चतुर्थीदिवशी विसर्जन केले जाणार असल्याने कराड शहरात पोलिस, पालिका प्रशासनाकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून सीसीटिव्ही कॅमेरेद्वारे घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवले जात आहे. या दरम्यान कराड येथील कृष्णा नदीपात्रालगत विसर्जनस्थळी आज दुपारी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी … Read more