छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे खोटी हे सिध्द करून दाखवा; साताऱ्यात शिवेंद्रराजेंचे विरोधकांना आव्हान

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्यासारखी व त्यावेळची वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, परंतु ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याअगोदरच त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत का? असा … Read more

सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती हा दुर्भाग्यपूर्ण निर्णय : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan News jpg

कराड प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे समाज माध्यमावर एक पत्र फिरत आहे की, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणे आहेत. ही जर बातमी खरी असेल तर कशा पद्धतीने सरकार चालत आहे? हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल. तसेच खाजगी 10 कंपन्यांच्या मार्फत 70 हजार नोकर भरती करण्याचे सरकारने जीआर काढलेला आहे, हा जीआर सर्वत्र उपलब्ध आहे. सरकारचा … Read more

भरवस्तीत पहाटे बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला; हल्ल्याचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Leopard Attacked Dogs News jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी बिबटयांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी पहाटे वराडे गावात बिबट्याने कुत्र्यांवर केलेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आज रविवारी पहाटेच्या सुमारास कोयना वसाहतीमधील भर वस्तीत एक बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही … Read more

खा. उदयनराजेंनी घेतली वेटणे – रणसिंगवाडीतील उपोषणकर्त्यांची भेट; उपोषणस्थळावरूनच केला थेट फडणवीसांना फोन…

Udayanraje Bhosale Visited Hunger Strike News

सातारा प्रतिनिधी । कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळण्याची कार्यवाही होणेबाबत गेली 7 दिवसांपासून येथील ग्रामस्थांकडून उपोषण केले जात आहे. दरम्यान, चालू असलेल्या आमरण उपोषणाला खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच भेट दिली व आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपोषणस्थळावरून थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन … Read more

तुळजापूरहून देवदर्शन करून परतताना गाडीची धडक; अपघातात एकाच कुटूंबातील 6 जण जखमी

Accideant News jpg

सातारा प्रतिनिधी | तुळजापूर येथून देवदर्शन करून परतत असताना वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील लटिंगे कुटूंबियांच्या गाडीची झाडाला भीषण धडक झाली. शनिवारी रात्री झालेल्या अपघातात कुटूंबातील सहा जण जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल खाण्यात आले. सचिन लटिंगे (वय ४५), वैशाली लटिंगे (वय ४१), मंगल लटिंगे (वय ६५), प्रदीप लटिंगे (वय ३६), वर्षा लटिंगे (वय २६), … Read more

जखिणवाडीत मारामारी करणाऱ्या 6 जणांवर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Karad City Police

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील जखिणवाडी गावालगत असलेल्या कणसेमळा येथे मारामारीची घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी आता मारामारी करणाऱ्या 6 जणांविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पाटील, प्रथमेश पाटील, अमर पाटील, जय पाटील, प्रदीप पाटील व एक अनोळखी इसम अशी गुन्हा … Read more

कृष्णा नदीत बुडालेल्या 21 वर्षाच्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला

Karad Crime News 1 jpg

कराड प्रतिनिधी | खराडे, ता. कराड येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करताना 21 वर्षीय गणेश संतोष जाधव हा बुडाला होता. त्यानंतर त्याचे शोधकार्य राबविण्यात आले असता त्याचा मृतदेह काल सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शोध पथकाच्या हाती लागला. दुपारी एक वाजता त्याच्यावर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी अनंत … Read more

लोकनेते विलासकाकांचा ‘रयत’ कर्जमुक्त; आता 14 मेगावॅट वीजनिर्मितीही करणार

Adv. Uday Singh Patil Undalkar News 20231001 082427 0000 jpg

कराड प्रतिनिधी | अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने रयत सहकारी साखर कारखाना चालवला आहे. आता रयत कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त झाला असून यंदापासून रयत कारखाना प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करणार असल्याची माहिती कारखान्‍याचे अध्‍यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. तसेच रयत कारखाना १४ मेगावॉट वीजनिर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. … Read more

कोयना धरण 88.38 टक्के भरले; ‘इतका’ TMC जमा झाला पाणीसाठा

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा 93.02 टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता 12 टीएमसीची पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर काेयनेला 31 तर नवजाला 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला … Read more

तासाभरातच पावसानं कराडकरांची उडवली दैना; कुठे नाले तुंबले तर कुठे वाहतूक खोळंबली

Karad Rain News jpg

कराड प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणेशोत्सवापासून सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसापासून पाऊस चांगलाच कोसळत आहे. दरम्यान, आज शनिवारी दुपारनंतर तासभर पडलेल्या पावसाने कराड शहराला चांगले झोडपून काढले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. तर पावसामुळे शहरातील भाजी विक्रेत्यांसह सर्वांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर … Read more

आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्री शिंदेंचा सातारा जिल्हा राज्यात प्रथम

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिधा वाटपाची काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात आली. आतापर्यंत सातारा जिल्ह्याने ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

‘कराडकरांनो रोज चाला अन् आपल्या हृदयाला जपा’…’त्यांनी’ दिला अनोखा संदेश

Karad World Heart Day News

कराड प्रतिनिधी । आज जागतिक हृदय दिन असून हृदय आणि रक्त वाहिन्यासंबंधी रोगांचं निवारण आणि त्यांचे परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून कराड पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आज रॅली काढत कराड शहरातील नागरिकांना अनोखा संदेश देण्यात आला. ” कराड शहरातील नागरिक हो दररोज चाला आणि आपले ह्रदय उत्तम … Read more