राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी, तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा हल्लाबोल

Karad News 26

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज भाजपचे (BJP) महायुतीचे उमेदवार अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सभेतून थेट खासदार शरद पवार, राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “कर्नाटक, हिमाचल … Read more

सातारा, शिरवळ अन् पुसेगावात अवैध देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या तिघांना अटक; 13 लाख 30 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

Satara News 46

सातारा प्रतिनिधी । सातारा, शिरवळ व पुसेगांव याठिकाणी अवैध देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यांवर पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई केली आहे. तिघा जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १३ लाख ३० हजार ७१५ रुपये किंमतीचा प्रोव्हीबिशन मुद्देमाल जप्त केला आहे. १) अमोल शंकर नलवडे (वय ३४, रा. वेळे ता वाई जि सातारा), २) राजेंद्र शंकरराव जावळे (वय ५५, रा … Read more

गावखेड्यांमध्ये विविध पक्ष्यांचा किलबिलाट लागला वाढू; अधिवासास जागा उपलब्ध

Satara News 45

सातारा प्रतिनिधी | सध्या सर्वत्र झपाट्याने होत असलेल्या आधुनिकी करणामुळे प्राणी- पक्ष्यांच्या अधिवासावर विपरीत परिणाम झाला आहे, असा निष्कर्ष काढला जातो. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील गावागावात आणि परिसरात विविध जातींच्या पक्ष्यांचा वावर वाढला असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात पक्ष्यांची संख्या जादा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात अजूनही नैसर्गिक वातावरण टिकून आहे. … Read more

नवीन महाबळेश्वरला 100 सूचना-हरकती; आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी 2 दिवस बाकी

New Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) साताऱ्यात नवीन महाबळेश्वर वसवले जाणार आहे. यासाठी एमएसआरडीसीकडून प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या विकास आराखड्याला, नवीन महाबळेश्वर वसविण्याच्या राज्य सरकारच्या पर्यावरणप्रेमींकडून निर्णयाला पर्यावरणाच्या एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे या आराखड्यावर आतापर्यंत केवळ 100 जणांकडून सूचना हरकती सादर झाल्या असून त्या सादर करण्यासाठी अखेरचे … Read more

जिल्ह्यात शिक्षक पात्रता परिक्षा केंद्राच्या 13 ठिकाणी अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून जमावबंदी आदेश जारी

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । शिक्षक पात्रता परिक्षा सातारा शहरातील विद्यालय व महाविद्यालयांमध्ये 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 1 व दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होणार आहे. या अनुषंगाने परिक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी नागेश पाटील यांनी लागू केले आहे. … Read more

शरद पवार घेणार 11 दिवसांत 42 सभा; जिल्ह्यात ‘या’ 5 ठिकाणी धडाडणार तोफ

Karad News 24

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांसाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. अवघ्या ११ दिवसांत त्यांच्या ४२ सभा घेणार आहेत. दररोज चार सभांचे नियोजन देखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील हातातून गेलेला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या पाच ठिकाणी सभांतून तोफ धाडाडणार आहे. राज्यात २८८ विधानसभा मतदार … Read more

शेणोली रेल्वे स्टेशन जवळच्या बोगद्यातील रस्त्याची दयनीय अवस्था; निवडणूक प्रशासनाकडून ठेकेदारास कारवाईचा इशारा

Karad News 20241108 103043 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण मतदार संघातील संजयनगर मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी शेणोली रेल्वे बोगद्याखालील रस्त्याने निघालेल्या भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक व त्यांच्या प्रशासकीय फौजफाट्यास रस्त्याच्या प्रचंड गैरसोयीमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. याबाबत प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून रेल्वेच्या ठेकेदाराने काम सुरू केल्याचा बनाव करत या रस्त्यावर मुरूम टाकत नुसती मलमपट्टी केल्याने वाहनधारकांबरोबर प्रशासनाने तीव्र … Read more

कोरेगावात होरपळून दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू

Crime News 20241108 095148 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव येथील आरफळ कॉलनीनजीक असलेल्या एका शेळ्या- करडांच्या गोट्यास अज्ञातांनी काल रात्री दीडच्या सुमारास आग लावल्यामुळे दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, छप्पर जळून गेले आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की येथील नगरपंचायतीच्या रस्ते दिवाबत्ती विभागातील कर्मचारी ओंकार राजू गायकवाड (रा. अण्णा भाऊ … Read more

कोळेनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Karad News 20241108 091532 0000

कराड प्रतिनिधी | कराड – ढेबेवाडी रस्त्यावर कोळेनजीक बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. रस्त्यावर अचानक बिबट्या आल्यानंतर वेगात असणाऱ्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की कोळे- शिंगणवाडीदरम्यान रस्त्यालगत आज सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव … Read more

पाटणच्या आठवडी बाजारात प्रशासनाकडून मतदान जागृती

Patan News 5

पाटण प्रतिनिधी । 261 पाटण विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वीप मतदार जागरुकता उपक्रमांतर्गत प्रशासनातर्फे आज पाटणच्या आठवडी बाजारात मतदारांमध्ये मतदान जागृती करण्यात आली. यावेळी निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडी बाजारात जाऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. तसेच भाजी विक्री करणाऱ्यांना मतदानाचे महत्व पटवून सांगितले. जागरुक मतदार लोकशाहीचा अंगरक्षक, भविष्याची कल्पना करा आणि योग्य … Read more

वाईमध्ये वृद्धांसह दिव्यांग 139 मतदारांनी गृह भेटीद्वारे बजावला मतदानाचा हक्क

Wai News 4

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील वृध्द व 40 टक्के पेक्षा दिव्यांग असे जे मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी उपस्थिती राहू शकत नाहीत त्यांना गृह भेटीतून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा पर्याय ऐच्छिक असून त्यासाठी मतदारांचा नमुना 12 ड मध्ये मागणी अर्ज घेण्यात आला होता. … Read more

राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा उदयनराजेंनी घेतला समाचार; म्हणाले की, महाराष्ट्राची जनता…

Political News 11

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवराय हे युगपुरुष असून, त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा पाया रचला. अशा युगपुरुषाविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. अशी माणसं लोकशाहीच्या प्रक्रियेत आली तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा … Read more