जनावरे वाहतूक करणारा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फोडला

Satara News 20240901 084112 0000

सातारा प्रतिनिधी | जालना येथून अंगापूर येथे गोशाळेस जनावरे घेऊन जाणारे ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाढे फाटा ते खेड फाटा दरम्यान अडवले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एका ट्रकची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अंगापूर येथे असणार्‍या गोशाळेस जालना येथून जनावरे आणण्यात आली होती. यात एकूण पाच ट्रक होते. त्यातील … Read more

अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त डॉ. भारत पाटणकरांचा ४ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या हस्ते सन्मान

Satara News 20240901 081442 0000

सातारा प्रतिनिधी | कष्टकरी चळवळ क्षीण होत असतानाच श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर हे धरण, दुष्काळग्रस्तांसाठी लढा देत आहेत. ५० वर्षांपासून त्यांचे काम सुरू असून ही एक उद्भत घटना आहे. अशा लढावू नेतृत्वाचा अमृतमहोत्सवानिमित्त ४ सप्टेंबरला कोल्हापुरात कार्यगाैरव सन्मान होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून लोक येणार आहेत, अशी माहिती डाॅ. भारत पाटणकर अमृतमहोत्सवी कार्यगाैरव समितीचे … Read more

सातारा,सांगलीसह कोल्हापूरच्या प्रवाशांची होणार सोय; पुणे-बिकानेर एक्सप्रेस धावणार मिरजपर्यंत

Karad News 20240901 072915 0000

कराड प्रतिनिधी | कराड -पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली. तिवारी यांनी नुकताच … Read more

महाराज आमची चूक झाली म्हणत; कराडला युवकाचे नाक घासत आत्मक्लेश आंदोलन

Karad News 20240901 070238 0000

कराड प्रतिनिधी | मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडत असतानाचे पाहायला मिळत असताना, साताऱ्यातील माण येथील महेश करचे या युवकाने महाराज आमची चूक झाली, असे म्हणत कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळपर्यंत तीन किलोमीटर दंडवत घालुन रस्त्याला नाक घासत आत्मक्लेश आंदोलन केले. … Read more

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले कोयना धरणावर जलपूजन

Koyna News 20240831 185812 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणात १०० टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज जलपूजन आणि ओटी भरण करण्यात आले. कोयना धरण स्थळी झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, तहसीलदार अनंत गुरव,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता … Read more

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ कराडात परिवर्तन संघटनेने काढला मुकमोर्चा

Karad News 20240831 175108 0000

कराड प्रतिनिधी | बदलापूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कराड येथील परिवर्तन संघटनेच्या वतीने नुकताच कराडात मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. नेहा सुरेश दुबे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अश्रफ खान, राष्ट्रीय सरचिटणीस महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन संघटना सातारा जिल्हा मंगेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मूकमोर्चास उपाध्यक्ष जीवन सागरे, … Read more

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी; ‘इतक्या’ हेक्टरवरील शेतीचे झाले नुकसान

Satara News 20240831 110005 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत असून महिनाभरात झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे पाच तालुक्यांतील २५५.१२ हेक्टरवरील १३८० शेतकऱ्यांचे, तर बागायती पिकांचे कराड, पाटण आणि महाबळेश्वर तीन तालुक्यांतील ११.३० हेक्टरवर असे एकूण २६६.५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

कोयना धरणाचे दरवाजे बंद, वीजगृहातून विसर्ग कायम

Koyna News 20240831 090155 0000

पाटण प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रामधील पाऊस कमी झाल्यामुळे धरणामध्ये येणारी आवक कमी झाली आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वा. धरणाचे ६ वक्र दरवाजे बंद करून सांडव्यावरील विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येत आहे. कोयना नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी … Read more

शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांकडून बेलवडे नजीक महामार्गावर रास्ता रोको; अर्धा तास वाहतूक ठप्प

Karad News 20240831 082427 0000

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडून पंधरा दिवसात सर्व खड्डे मुजवण्यात येतील, अशी लेखी हमी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही खड्डेे कायम असून अपघातांची मालिका कायम असल्या कारणाने आक्रमक झालेल्या बेलवडे गावातील ग्रामस्थांसह शेतकर्‍यांनी महामार्गावर उतरून अचानकपणे रास्तारोको केला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. घटनास्थळी तळबीड पोलिस ठाण्याचे … Read more

पुतळ्याचे राजकारण करू नये असे म्हणत उदयनराजेंनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 20240831 074913 0000

सातारा प्रतिनिधी | राजकोट (मालवण) येथे घडलेली दुर्घटना ही निश्चितच दुर्दैवी आणि अपघाती आहे. देशातील सर्व जाती, धर्मातील नागरिकांमध्ये या घटनेचे दु:ख आहे. पुतळा उभारणीतील कच्चे दुवे आणि निसर्गाची अवकृपा या आणि केवळ याच कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणी स्वत:च्या लाभासाठी राजकारण करुन भांडवल करु … Read more

दहिवडीत ‘त्यांनी’ केला एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी पाठलाग करून केली दोघांना अटक

Crime News 20240831 071008 0000

सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी घरांपासून ते एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यांच्या कडून केला जात आहे. दरम्यान, दहिवडी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम फोडून त्यातील पन्नास लाखांपेक्षा जास्त रक्कम चोरण्याच्या प्रयत्न सुरू होता. याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पळून जाणाऱ्या चोरांना पोलिसांनी चार किलोमीटर पाठलाग करून पकडले. ही … Read more

पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊनही एमपीएससीने नोकरी नाकारली, साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदच्या संघर्षाला न्याय मिळणार का?

Satara News 20240831 064505 0000

सातारा प्रतिनिधी | पुरोगामी महाराष्ट्रात समाजातील उपेक्षितांसाठी आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आहेत. मात्र, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रान्सजेंडरना सरकार नोकरीत स्थान द्यायला अजुनही तयार नाही. याविरोधात लढा देत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदला एमपीएससीने नोकरी देण्यास नकार देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वतःहून कोर्टात गेला आहे. संग्राम-मुस्कान संस्थेनं तिच्या स्वप्नाला … Read more