सातारा जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्याधिकाऱ्यांकडून शस्त्र व जमाव बंदी आदेश

Satara News 28

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र … Read more

मतदार जनजागृतीसाठी फलटणमध्ये मानवी साखळीमधून साकारला महाराष्ट्राचा नकाशा

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 1 हजार विध्यार्थी, युवक व मतदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फलटण 100 टक्के मतदान रांगोळीच्या व मानवी साखळी द्वारे करण्यात आले तसेच मानवी साखळी द्वारे जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. फलटण येथील … Read more

मतदार यादीत Deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही – निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । मतदारयादीत deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. अशी कोणतीही procedure मतदान केंद्रावर होत नसल्याची महत्वाची माहिती सातारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की, ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला … Read more

पंतप्रधान कितीही म्हणत असले तरी महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही : खा. अमोल कोल्हे

Karad News 1

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा हरियाणा करू अशी भाषा करत आहेत. परंतु त्यांच्या हेही लक्षात आहे की हे करत असताना महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती पहाडासारखी उभी आहे. ते महाराष्ट्रातील जनतेचे सह्याद्री आहेत. त्यामुळे पंतप्रधान कितीही म्हणत असले तरी महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही, हे त्यांनाही माहित आहे. बटेंगे तो कटेंगे सारख्या नरेटिव्हला महाराष्ट्र … Read more

कोरेगाव हद्दीत एसटी बसच्या धडकेत चिमुरडा ठार; बसचालकावर गुन्हा

Crime News 7

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुसेगाव मार्गावर कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर भरधाव एस.टी.ने चार वर्षांच्या चिमुरड्याला पाठीमागून धडक दिली. यात हा चिमुरडा ठार झाला. श्रवण प्रसाद गोळे (वय ४, रा. सद्‌गुरूनगर, कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. रविवारी रात्री पुसेगाव-सातारा ही बस (क्रमांक एम. एच. २० … Read more

अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा; पुसेसावळीतील सभेत डॉ. कोल्हे यांचा महायुतीवर निशाणा

Amoll Kolhe News 20241113 101119 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा करण्यात आली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला असणाऱ्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासला. त्यामुळे प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनात राग आहे. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात आयोजित सभेत ते बोलत … Read more

जयकुमार गोरेंना कोविड घोटाळा भोवणार; हायकोर्टाने सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले

Jaykumar Gore News 20241113 083126 0000

सातारा प्रतिनिधी | कोविड घोटाळा भाजपचे सातारा येथील उमेदवार जयकुमार गोरेंच्या चांगलाच अंगलट आला आहे. या घोटाळ्याचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले आहे. घोटाळ्याचा निःसंदेह तपास करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले … Read more

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम!

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र, त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली … Read more

पाटण विधानसभा मतदार संघात रविवारी धडाडणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ

Patan News 3

पाटण प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यभरात प्रचार सभांनी चांगलेच वातावरण तापले आहे. राजकीय पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी मतदार संघात प्रकाहर सभा घेऊन आपल्या विरोधकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, नुकतेच शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पाटण विधानसभा मतदार संघाचे उमेवार हर्षद कदम यांच्या प्रचारार्थ सभा घेत राज्य उत्पादनशुल्क … Read more

उंडाळेत गॅस सिलिंडर स्फोटात उत्तर प्रदेशातील आईसक्रिम विक्रेत्याच्या 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Karad News 15

कराड प्रतिनिधी । घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावात घडली आहे. मृत मुलगा हा आईसक्रिम विक्रेत्याचा असून हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील उंडाळे गावात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन १३ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना … Read more

निवडणूक निरीक्षकांकडून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या स्ट्राँग रूमसह मशीन्सची पाहणी

Karad News 14

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर पाठविण्यासाठी मतदान यंत्रे तयार करून सुरक्षितपणे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमला तसेच मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरू असलेल्या सिलिंग हॉलला आज निवडणूक निरीक्षण गीता ए. यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रथम त्यांनी मशीन्सच्या सिम्बॉल लोडिंगची तपासणी करून १००% यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. … Read more

गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी दक्ष राहावे; विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांचे निर्देश

Satara News 24

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष खर्च निरीक्षक श्री. बी. आर. बालकृष्णन यांनी नुकताच सातारा जिल्ह्यातील निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. यावेळी निवडणुकीत विविध प्रकारची प्रलोभने, मद्य किंवा पैसे यांच्या आधारावर मतदान होऊ नये. संपूर्ण मतदान प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शीपणे व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांनी प्रभावी कामगिरी करावी, … Read more