विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी साताऱ्यातील शाहू नगरी सजली

Satara News 20240906 171415 0000

सातारा प्रतिनिधी | उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या आनंदोत्सव अर्थात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शुक्रवारी सातारकर यांची लगबग दिसून येत होती. सातारा शहरातील मोती चौक, राजवाडा परिसरात फळे, फुले ,पाने ,पत्री तसेच विविध प्रकारचे मोदक खरेदीसाठी सातारकरांची झुंबड उडाली होती. राजवाडा परिसरातील जनसेवा फ्रुट स्टॉलवर असलम बागवान यांनी देश-विदेशातील अनेक उत्कृष्ट प्रतीची फळे विक्रीसाठी उपलब्ध केली … Read more

लाडकी बहीण योजनेवरुन शंभूराज देसाईंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुनावल; म्हणाले की,

Satara News 20240906 161950 0000

सातारा प्रतिनिधी | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यमुळे आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी हे आम्हाला खटकलं असल्याचं म्हणत अजित पवार गटावर जाहीर नाराजी … Read more

उरमोडी धरण भरले; धरणातून चौथ्यांदा विसर्ग

Satara News 20240906 130706 0000

सातारा प्रतिनिधी | यंदा दमदार सुरू असलेल्या पावसामुळे साताऱ्याच्या पश्चिमेला असलेले उरमोडी धरण अगदी काठोकाठ म्हणजे १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून गुरुवारी चौथ्यांदा विसर्ग करण्यात आला. यंदा आतापर्यंत तब्बल २.६० टीएमसी पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले असून हा उच्चांक ठरला आहे. पश्चिमेकडे परळी खोऱ्यात यंदा जोरदार पाऊस कोसळला असून अद्याप पावसाची बरसात कायम आहे. … Read more

‘प्रधानमंत्री आवास’मध्ये 4,600 घरकुले; लाभार्थ्यांना हक्काचा निवारा

Satara News 20240906 115323 0000

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी सातारा जिल्ह्याला ४ हजार ६०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामुळे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून बेघर, कच्ची घरे असणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची २०१६ पासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात … Read more

साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात होर्डिगवरून उपमुख्यमंत्री अजितदादांचा फोटो गायब

Satara News 20240906 095708 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य केले. या योजनेतील पैशांच्या वाटपानंतर आता योजणेवरून श्रेयवाद रंगला आहे. याचेच उदाहरण हे साताऱ्यात पहायला मिळतेय. ज्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेची घोषणा केली त्यांचाच फोटो सातारा शहरातील पोवई नाक्यावर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची जाहिरात … Read more

टोल वसुलीसाठी एसटी बस रोखल्या; आनेवाडी टोल नाक्यावर तणाव

Satara News 20240906 090221 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या एसटी बसेसना राज्य शासनाने टोलची सवलत दिली आहे. असे असताना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांच्या सुमारे 50 एसटी बसेस आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी टोल देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. … Read more

कोयना धरणातून 50 हजार 442 क्युसेक्स विसर्ग

Koyna News 20240906 075144 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पाऊस वाढल्याने कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर कोयना धरण १०० टक्के भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाचे गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सहा वक्र दरवाजे ५ फूट ६ इंच फुटांपर्यंत उघडून धरणातून ५० हजार ४४२ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सद्या कोयना धरण पायथा … Read more

रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी येईल – उपसंचालक महेंद्र ढवळे

Satara News 20240905 194956 0000

सातारा प्रतिनिधी | रेशीम शेती व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करावा. रेशीम शेती हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअचणी दूर होतील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनात समृध्दी येईल त्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असे आवाहन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले. … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे; जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

Satara News 20240905 175857 0000

सातारा प्रतिनिधी | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील 629 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व मयत शेतकऱ्यांचे वारसांनी वारसनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ प्रोत्साहनपर लाभ योजना २०२२ अंतर्गत रु. 50 हजार पर्यंत लाभासाठी सातारा जिल्हयातील … Read more

सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

Satara News 20240905 163200 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान एकूण ७१८५ बॅलेट युनिट, ४०२० कंट्रोल युनिट व ४३४० ईव्हीएम व्हीव्हीपॅट इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रे अद्ययावत करण्यात आली आहे. ही यंत्रे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, कोडोली, … Read more

सातारा तहसील कार्यालयाला वाहनांच्या लिलावातून ‘इतका’ लाखांचा महसूल

Satara News 20240905 150837 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आवारामध्ये पडून राहिलेल्या 18 वाहनांचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. या लिलावातून तहसीलदार कार्यालयाला 18 लाख 93 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई दरम्यान अठरा वाहने जप्त करण्यात आली होती. ही वाहने कित्येक दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात पडून होती. या वाहनांच्या गर्दीमुळे पार्किंगचा गंभीर … Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सज्ज; कायदा व सुव्यवस्थेसाठी 600 जण ‘रडारवर’

Satara News 20240905 122356 0000

सातारा प्रतिनिधी | दि. 7 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. 7 ते 17 सप्टेंबर या 10 दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सवकाळात प्लाझ्मा, लेझर लाइटवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्णकर्कश आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा दणदणाट रोखण्यासाठी ही यंत्रणा मिरवणुकीत येऊच नये यासाठी नाकाबंदी करून ती रोखणार आहे. तसेच ज्या व्यक्तींवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तसेच … Read more