सातारा प्रतिनिधी | बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी अथवा इतर मार्गाने चोरीस गेलेली तक्रारदारांची मालमत्ता बहुतांश गुन्हयांचा तपास करून हस्तगत केली. याबद्धल सन 2023 या सालातील सर्वोत्कृष्ट ‘प्रॉपर्टी रिकव्हरी’ चा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम 5 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बोरगाव पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या दाखल गुन्हयांपैकी अनेक गुन्हे सपोनि. रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण टीम, बीट अंमलदार यांनी उघडकीस आणले. त्यात लंपास केलेली मालमत्ता हस्तगत केली. त्यातील काही मालमत्ता न्यायालयीन प्रक्रियेनंतर तक्रारदारांच्या स्वाधीनही केली.
सन 2023 मधील जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या तुलनात्मक आकडेवारी पाहून बोरगाव पोलीस ठाण्याला पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या हस्ते, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या उपस्थितीत सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सपोनि तेलतुंबडे, उपनिरीक्षक दीपक कारळे, सहाय्यक फौजदार फिरोज शेख, हवालदार हणमंत सावंत, नितीन महाडिक, मोना निंबाळकर, अमोल गवळी यांच्या सह डीबी टीमचे हवालदार दादा स्वामी, पो. ना दिपक मांडवे, प्रशांत चव्हाण, केतन जाधव, सत्यम थोरात, नम्रता जाधव हजर होते. या पुरस्काराबद्दल पोलिसांचे बोरगाव परिसरातून कौतुक होत आहे.