बोरगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई : 25 लाखांचा अंमली पदार्थ,वाहन जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत दोघं जणांना अटक केल्याची घटना सातारा कराड मार्गावर घडली. या प्रकरणी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

1) बाबासो बडा मडके (वय 36, रा. महावीर चौक, रुई जि.कोल्हापुर) 2) दिपक कल्लापा अबदान (वय 42, रा. महावीर चोक रुई जि. कोल्हापुर) असे अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटख्यावर कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी किरणकुमार सुपबशी तसेच सहाय्य्क पोलीस निरीक्षक रविंद्र बडे यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबड यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना कारवाईबाबतच्या सूचना दिल्या.

दि. 30 रोजी सहा पोलीस निरीक्षक श्री रविंद्र तेलबडे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कराड ते सातारा जाणारे महामार्गावरील लेनने गुटख्याची वाहतूक करणारी गाडी जाणार आहे. त्यानंतर तेलबडे यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदाराना हि माहिती दिली. बोरगाव पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये काशीळ ते नागठाणे मार्गाने पेट्रोलिंग करीत असताना अतीत गावच्या हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर एका दुकानाजवळ संबंधित अंमली पदार्थ वाहतूक करणारे गाडी घेऊन आले. यावेळी पोलिसांनी गाडी क्रमांक (MH09-GT-1355) थांबवून त्यावरील चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारानी वाहनाची तपासणी केली.

त्यावेळी त्यामध्ये हिरा पान मसाला रॉयल 717 टोबैको गुटखा व वाहन असा एकूण 25 लाख रुपये किमतीच्या प्रतिवधीत माल (गुटखा) तसेच वाहन ताब्यात घेतलेले आहे. अन्न सुरक्षक विभाग सहाय्य्क आयुक्त अपर्णा भोईटे तसेच अन्न सुरक्षा विभाग अधिकारी श्रीमती वंदना विठ्ठलराव रुपनवर, श्रीनगर हवलदार श्रीमती प्रियांका नामदेव वाईकर यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी समक्ष हजर होऊन ताब्यात मुद्देमाल जप्त केला. त्याबाबत बोरगाव पोलीस ठाणे गुर.नं.599/2023 अन्न सुरा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2) (1), 26(2)(IV). 27 (3)(e), 30(2)(a),3, 59, भा.द.वि. सं. 188.272.273.328.34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर अधिक्षक आचल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद तेलतुंबडे पोवीस हवालदार दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशात चक्षाण, दिपककुमार मांडवे, पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव, पोहवा अमोल सपकाळ, पोकों विशाल जाधव चालक पोना उत्तम कदम, पानी सदरची कारवाई केलेली आहे.