बोरगाव पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून केली 27 जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यात काशीळ येथे एका शेतात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्यांनी तब्बल 27 जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून रोकड, जुगाराचे साहित्य आणि मोबाइल, वाहने, असा सुमारे 17 लाख 83 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला.

लक्ष्मण मारुती यादव, वैभव विजय साळुंखे, समीर सर्जेराव भोसले, मारुती सीताराम दरवडे, दत्ता सुदाम सोनवणे, सुरेश बाळकृष्ण रोमण, विलास नानासाहेब राजेमहाडिक, गुड्डू रावत कुमार, सदानंद नारायण देवाडिगा, रोहित रामचंद्र घाडगे, शहाबुद्दीन अकबरमिया, संदीप श्रीपती गुंजले, डालू जितू पंडित, विकास भानुदास पवार, किशोर पांडुरंग बारटक्के, जयवंत रामचंद्र जाधव, दत्तात्रय शिवाजी वायदंडे, समीर साहेब पठाण, अशोक हनुमंत मोहिते, विशाल जालिंदर नरसाळे, युवराज दिलीप माने, श्रीकांत इंद्रदेव प्रसाद, रोहित मानसिंग घाडगे, अझरुद्दीन अब्दुल शेख, मोहन बाबासो शिंदे, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यात काशीळ गावानजीक ‘अतिथी’ नावाचे एक हाॅटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागील शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री 8 वाजता पोलिसांनी 4 पथके घेऊन या ठिकाणी अचानक छापा टाकला.

त्यावेळी पोलिस आल्याचे पाहून काही जुगारी पळून गेले तर इतर २७ जण जुगार खेळताना पोलिसांना रंगेहाथ सापडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोकड, मोबाइल, वाहने, असा सुमारे १७ लाख ८३ हजारांचा ऐवज जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने काशीळ परिसरात खळबळ उडाली. या घटनेची बोरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार सपकाळ हे अधिक तपास करीत आहेत.