सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. आज, अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घटना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे.
संचिता साळुखे (वय 22) असं या महिलेचं नाव असून 27 जुलै रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर कृष्णा नदीपात्रात शोध मोहिम राबवण्यात आली, त्यावेळी मुलीचा मृतदेह सापडला होता. आता, 7 दिवसांनंतर आईचाही मृतदेह सापडला आहे.
सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील संचिता साळुंखे (वय 22 वर्षे) महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत आणले होते. मात्र, कौटुंबिक कारणास्तव या महिलने 27 जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली, तसेच आईच्या या कृत्यामुळे चिमुकलीला का शिक्षा?, असे म्हणत अनेकांना शोक, सहवेदना व्यक्त केल्या.
दरम्यान, 27 जुलै रोजी झालेल्या शोधमोहिमेत चिमुरड्या अक्षिताचा मृतदेह बचाव बथकाला सापडला होता. मात्र, आई संचिता तेव्हापासून बेपत्ता होती. आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या युवकांना घटनास्थळापासून आठ किलो मिटरवरील गोजेगाव गावाच्या हद्दीत मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आले. याबाबत, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर, हा मृतदेह पाण्याबाहेर काढून नातेवाईकांना देण्यात आला.