कराड प्रतिनिधी | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने समस्त देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगत कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज कराड येथील दत्त चौकात आ. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष एकनाथ बागडी
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर युवा मोर्चाचे सुदर्शन पाटसकर तसेच सुनील शिंदे,शंकर शेजवळकर, गणेश यादव शिवप्रतिष्ठानचे सागर आमले ,धनाजी माने भारत जत्रे प्रमोद शिंदे राजू सोनवले ,विनायक भोसले जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, विश्वास संकपाळ,रोहित संकपाळ, आदींसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितली आहे. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते. त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले. मी याबद्दल जाहीर माफी मागतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.