केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डांसह उपमुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी कराडात; विंगात भाजपचा होणार भव्य जनसंवाद मेळावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा गुरुवारी, दि. २२ रोजी कराड दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी ३ वाजता कराड तालुक्यातील विंग येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जे. पी. नड्डा यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर मंत्री उपस्थित राहणार असून या मेळाव्याच्या निमित्ताने भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.

कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री ना. नड्डा गुरुवारी कराड दौऱ्यावर येत असून या कार्यक्रमानंतर भाजपा कराड दक्षिणच्यावतीने विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे हे मान्यवर मंत्री प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

तसेच खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार आनंदराव पाटील, दिलीपराव येळगावकर, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, प्रदेश सचिव भरत पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांच्यासह पक्षाच्या विविध मोर्चांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.